Saturday 29 January 2022

अन्नातील पोषक तत्वे/घटक

स्थूल पोषक तत्वे – शरीरासाठी सर्वांत जास्त आवश्यकता. उदा. प्रथिने, कर्बोदके, स्निग्ध पदार्थ (मेदपदार्थ)

सूक्ष्म पोषक तत्वे – अत्यंत कमी प्रमाणात (अल्प) आवश्यकता. उदा. जीवनसत्वे, क्षार.

🌿🌿प्रथिने (प्रोटीन्स) :🌿🌿

प्रथिने हि अमिनो आम्लांपासून बनलेली असतात.

शरीराला ’24’ अमिनो आम्लांची गरज असते.

त्यापैकी ‘9’ अमिनो आम्ले शरीरात निर्माण होऊ शकत नाहीत. ती आहारातून पुरवावी लागतात. म्हणून अशा अमिनो आम्लांना ‘आवश्यक अमिनो आम्ले’ असे म्हणतात.

(लायसीन, ल्युसीन, आयासोल्युसीन, व्हॅलिन, हिस्टीजीन, थ्रिओनिन, टिप्ट्रोफॅन, मिथिओनिन, फिनाईल, अॅलॅनिन)

अमिनो आम्ले ही कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर व कधी-कधी फॉस्फरस व लोह यांपासून बनलेली असतात.

🌿🌿प्रथिनांची साधने :🌿🌿

🌷प्राणीज साधने – दूध, अंडी, मांस, मासे.

🌷वनस्पतीज साधने –

डाळी-तूर, मूग, हरभरा, उडीद, मसूर, सोयाबीन  
                

धान्ये – ज्वारी, बाजारी, नाचणी, गहू.

तेलबिया – शेंगदाणे, तीळ, बदाम, करडई.

डाळींमध्ये प्रथिनांचे प्रमाण – 20-25% असते.

सोयबींमध्ये प्रथिनांचे प्रमाण – 43.2% (सर्वाधिक)

दुधामध्ये प्रथिनांचे प्रमाण- 3.2-4.3%

अंडी प्रथिनांचे प्रमाण – 13%

मासे प्रथिनांचे प्रमाण – 15-23%

मांस प्रथिनांचे प्रमाण – 18-26%

प्राणीज प्रथिने ही वनस्पतीज प्रथिनांपेक्षा ‘उच्च दर्जाचे’असतात. कारण त्यांच्यामध्ये सर्व आवश्यक अमिनो आम्ले उपलब्ध असतात.

No comments:

Post a Comment

Latest post

काकोरी कट घटना

( काकोरी ट्रेन लुट म्हणूनही ओळखली जाते) ही ब्रिटिश वसाहतवादी शासनाविरुद्धच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वपूर्ण घटना होती.  - दिना...