Friday 27 March 2020

'करोना'वर 'हायड्रोक्जिक्लोरीक्वीन' औषध प्रभावी, 'नॅशनल टास्क फोर्स'चा सल्ला


🔷करोना विषाणूमुळे फैलावणाऱ्या 'कोविड १९' या आजाराच्या अतिगंभीर प्रकरणांत उपचारासाठी 'हायड्रोक्जिक्लोरीक्वीन' (Hydroxychloroquine) या औषधाचा वापर केला जाऊ शकतो, असा सल्ला 'इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च'द्वारे (ICMR) गठीत करण्यात आलेल्या 'नॅशनल टास्क फोर्स'नं दिलाय.

🔷 'हायड्रोक्जिक्लोरीक्वीन' या औषधाचा वापर सध्या मलेरियाच्या रुग्णांसाठी औषध म्हणून केला जातो.

🔷आता, हेच औषध संशयित किंवा करोना पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या आरोग्य सेवकांना दिलं जाऊ शकतं, असं 'आयसीएमआर'नं म्हटलंय.

🔷याशिवाय करोना पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांना आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनाही हे औषध दिलं जाऊ शकतं, असं सूचित करण्यात आलंय.

🔷अतिशय वेगानं संक्रमित होणाऱ्या 'करोना व्हायरस'चा प्रसार रोखण्यासाठी आत्तापर्यंत लस शोधून काढण्यात यश आलेलं नाही.

🔷याच दरम्यान, 'हायड्रोक्जिक्लोरीक्वीन' (Hydroxychloroquine) हे औषध करोना व्हायरसच्या उपचारांत फायदेशीर ठरू शकतं, असं रिसर्चमधून समोर आलंय. या रिसर्चमध्ये 'क्लोरोक्वीन फॉस्फेट' आणि 'हायड्रोक्जिक्लोरीक्वीन सल्फेट' करोनाच्या उपचारांत मदत करू शकतं, असं आढळून आलं.

🔷उल्लेखनीय म्हणजे, अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील काही दिवसांपूर्वी याच औषधाचं नाव सूचवलं होतं. अमेरिकेतील 'फूड ऍन्ड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन' (FDA) हे औषध मोठ्या प्रमाणात आयात करत आहेत.

🔷चीनच्या आरोग्य विभागानंही फेब्रुवारी महिन्यात 'क्लोरोक्वीन फॉस्फेट'च्या वापराचे सकारात्मक परिणाम दिसून येत असल्याचं जाहीर केलं होतं.

No comments:

Post a Comment

Latest post

Important Lakes in India

🔹डल झील :- जम्मू-कश्मीर 🔹वुलर झील :- जम्मू-कश्मीर 🔹बैरीनाग झील :- जम्मू-कश्मीर 🔹मानस बल झील :- जम्मू-कश्मीर 🔹नागिन झील :- जम्मू-कश...