Thursday 2 April 2020

4 सरकारी बँकांचं कर्ज झालं स्वस्त.

गेल्या काही दिवसांपूर्वीच आरबीआयनं रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेपो रेटमध्ये कपात केली  आहे.

रेपो रेट 75 बेसिस पॉइंटने कमी करून 4.4%  करण्यात आला असून, रिव्हर्स रेपो दरातही 90 बेसिस पॉईंटने कमी करून 4% करण्यात आला आहे.तर कर्जावरील व्याजदर 5.15 टक्क्यांवरून 4.4 टक्क्यांवर आला असून, अल्पमुदतीच्या कर्जावरील व्याजदरात घट करण्यात आली आहे.

1 मार्च रोजी असलेल्या सर्व टर्म लोनचे तीन महिन्यांचे मासिक हप्ते पुढे ढकलण्याचे अधिकार सर्व बँका तसेच नॉनबँकिंग फायनान्स कंपन्या यांना देण्यात आले आहेत.याबाबतचा निर्णय बँका तसेच कंपन्यांवर सोडण्यात आला होता.

या तीन महिन्यांच्या कालावधीसाठी दंडाच्या स्वरूपात व्याज लागणार नाही, असे दास यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर आता चार सरकारी बँकांनी व्याजदर घटवले आहेत.सर्वप्रथम स्टेट बँक ऑफ इंडियाने (एसबीआय)  व्याजदरात कपात करण्याची घोषणा केली.

त्यानंतर बँक ऑफ इंडिया (बीओआय), बँक ऑफ बडोदा (बीओबी)ने कर्जाचे दर कमी केले. आता आणखी एक सरकारी बँक युनियन बँक ऑफइंडियाने (यूबीआय) कर्जाच्या व्याजदरात मोठी कपात करण्याची घोषणा केली आहे.

तसेच युनियन बँक ऑफ इंडियाने आपल्या रेपो दराशी संबंधित कर्जाचे व्याजदर 0.75 टक्क्यांनी कमी केले. कर्जाचे दर कमी झाल्याने आता या बँकांकडून गृह कर्ज किंवा वाहन कर्ज घेणे स्वस्त होईल.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 08 मे 2024

◆ ‘जागतिक रेडक्रॉस दिन’ दरवर्षी 8 मे रोजी साजरा केला जातो. ◆ व्लादिमीर पुतिन हे पाचव्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. ◆ ‘बॉर्डर रो...