Wednesday 1 April 2020

टोकियो ऑलिम्पिकच्या नवीन तारखा जाहीर.

👇👇👇👇👇👇👇👇👇👇

✴️जगभरात पसरलेल्या करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा फटका, जपानच्या टोकियो शहरात होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेलाही बसला.

✴️आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने परिस्थितीचं गांभीर्य ओळखत ही स्पर्धा एक वर्ष पुढे ढकलली आहे.

✴️२०२१ साली होणाऱ्या या स्पर्धेच्या नवीन तारखा आज जाहीर करण्यात आल्या आहेत.

✴️२३ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान ही स्पर्धा रंगणार असल्याचं आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने स्पष्ट केलंय.

✴️गेल्या काही दिवसांमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या स्पर्धेच्या आयोजनासाठी ज्या-ज्या संघटनांनी हातभार लावला आहे, त्या सर्वांचा मी आभारी आहे.

✴️जपान सरकार, टोकियोचं स्थानिक प्रशासन आणि सर्वांच्या सहकार्याने आपण या संकटाचा सामना करु असा मला विश्वास आहे, अशा शब्दांत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष थॉमस ब्लाख यांनी आभार मानले.

✴️इतर महत्वाच्या स्पर्धांसोबत ऑलिम्पिकचं आयोजन होणार नाही याची काळजी घेऊन नवीन तारखा जाहीर करण्यात आलेल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...