Monday 15 November 2021

फुल व त्याची अंगके

◾️ निदलपुंज (Calyx) :
_____________
कळी अवस्थेत पाकळ्या हिरव्या रंगाच्या पानासारख्या भागाने झाकलेल्या असतात. हे आवरण म्हणजे निदलपुंज होय.

◾️ दलपुंज (Corolla) :
_____________
दलपुंज पाकळ्यांनी (Petals) बनलेला असतो.

◾️ पुमंग (Androecium) :
_____________
फुलाचा हा पुल्लिंगी भाग असून तो पुंकेसराचा (Stamen) बनलेला असतो. त्यात परागकोष व वृंत असतात.

◾️ जायांग : (Gynoecium) :
_____________
फुलाचा हा स्त्रीलिंगी भाग असून तो स्त्रीकेसराचा (Carpel) बनलेला असतो त्यात कुक्षी, कुक्षीवृंत व अंडाशय असते.

◾️ परागीभवन
_____________
परागकोष पक्व झाल्यावर फुटतो आणि त्यातील परागकण हे कुक्षीवर जाऊन पडतात. या क्रियेला परागीभवन (Pollination) असे म्हणतात. या परागीभवनापासन पढे अंडाशयातील बीजांडांचे फलन होऊन त्याचे रूपांतर बीमध्ये होते, तर अंडाशयाचे रूपांतर फळात होते.

__________________________

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 18 एप्रिल 2024

🔖 प्रश्न.1) मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कोणाला जाहीर झा...