Sunday 19 April 2020

आँटॅरिओ सरोवर

उत्तर अमेरिका खंडातील पंचमहा सरोवरांपैकी सर्वांत लहान आणि पूर्वेकडील सरोवर. ८५ किमी. रुंद व ३१० किमी. लांबीच्या या अंडाकृती सरोवराचे पृष्ठक्षेत्रफळ १९,४७७ चौ.किमी. असून त्याशिवाय सरावराचे एकूण जलवाहनक्षेत्र ९०,१३० चौ.किमी. आहे. समुद्रसपाटीपासून हे ७५ मी. उंचीवर असून त्याची जास्तीत जास्त खोली २३७ मी. आहे १६१५ मध्ये फ्रेंच समन्वेषक शांप्लँ व त्याच्या सहकाऱ्यांनी या सरोवराचा शोध लावला. १७६३ च्या सुमारास फ्रेंचांकडून याचा ताबा ब्रिटिशांकडे आला. हिमयुगीन घडामोडीत निर्माण झालेली ही सरोवरे आहेत. आँटॅरिओ सरोवराला मिळणारी नायगारा ही प्रमुख नदी असून जेनेसी, ऑस्वीगो व ब्लॅक या दक्षिणेकडून व ट्रेंट ही उत्तरेकडून मिळते. सरोवराच्या अगदी पूर्वेस पाच बेटे असून तेथूनच सेंट लॉरेन्सचा प्रवाह सुरू होतो. किंग्स्टन, टोरँटो, हॅमिल्टन ही या सरोवरावरील कॅनडाची व रॉचेस्टर आणि ऑस्वीगो ही अमेरिकेची प्रमुख बंदरे आहेत. सेंट लॉरेन्स मुखाकडील प्रदेश हिवाळ्यात गोठत असल्याने या सरोवरातून मर्यादित वाहतूक चालते. ईअरी सरोवराशी नायगारा धबधबा टाळून वेलंड कालव्याने व ह्यूरन सरोवराशी ट्रेंट कालव्याने हे जोडलेले आहे. ‘सेंट लॉरेन्स सी वे’  झाल्यापासून वाहतुकीत सुधारणा झाली आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

WORLD AIR QUALITY REPORT 2023

🔶जागतिक हवा गुणवत्ता अहवाल २०२३ • अहवाल जाहीर करणारी संस्था : IQAIR स्वित्झर्लंड (स्थापना 1963) • एकूण देश : 134 ☑️या अहवालानुसार 👇👇 ...