Friday 24 April 2020

देशातच नाही तर आशियात एक नंबर… मुकेश अंबानी ठरले सर्वात श्रीमंत व्यक्ती त्यांनी जॅक मा यांना मागे टाकलं आहे.

📌 रिलायन्स जिओ आणि फेसबुक यांच्यात झालेल्या कराराचा फायदा रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांना झाला आहे. फेसबुकसोबत झालेल्या करारामुळे त्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे. ते पुन्हा एकदा आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांनी जॅक मा यांना पछाडत पुन्हा एकदा पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे.

📌ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सनुसार एका दिवसात त्यांच्या संपत्तीत ४६९ कोटी डॉलर्स म्हणजेच ३४ हजार कोटी रूपयांची वाढ झाली आहे.ब्लूमबर्ग बिलेनिअर इंडेक्सनुसार २३ एप्रिल रोजी सकाळी ९.३० वाजेपर्यंत मुकेश अंबानी यांच्याकडे एकूण ४ हजार ९२० कोटी डॉलर्स म्हणजेच ३.७१ लाख कोटी रूपयांची संपत्ती होती.

📌 एका दिवसात त्यांच्या संपत्तीत तब्बल २२ हजार ९७५ कोटी रूपयांची वाढ झाली आहे. रिलायन्स जिओ आणि फेसबुकमधील करारानंतर रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्येही १० टक्क्यांची वाढ झाल्याचं पाहायला मिळालं होतं. सध्या जॅक मा यांच्याकडे एकूण ४ हजार ६०० कोटी डॉलर्स म्हणजेच ३.४७ लाख कोटी रूपयांची संपत्ती आहे.

📌 जिओ टॉप ५ कंपन्यांमध्ये
फेसबुकच्या रिलायन्स जिओमध्ये ४३ हजार ५७४ कोटी रूपयांची गुंतवणुकीनंतर जिओ प्लॅटफॉर्मची व्हॅल्यू ४.६२ लाख कोटी रूपये झाली आहे.

📌 कंपनीच्या व्हॅल्यू प्रमाणे पाहिलं तर शेअर बाजारात लिस्टेड असलेल्या कंपन्यांपैकी केवळ ४ कंपन्या या रिलायन्स जिओच्या पुढे आहेत. त्यापैकी एक रिलायन्स जिओची पॅरेंट कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज हीदेखील आहे. त्याव्यतिरिक्त टीसीएस, एचडीएफसी बँक आणि हिंदुस्तान युनिलिव्हर या कंपन्या जिओच्या पुढे आहेत. तर दुसरीकडे जिओनं इन्फोसिस आणि एचडीएफसी लिमिटेड यासारख्या दिग्गज कंपन्यांना मात्र मागे टाकलं आहे.

📌 फेसबुकची गुंतवणूक
सोशल मीडियामधील लोकप्रिय प्लॅटफॉर्म असलेल्या फेसबुकने भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी असलेल्या रिलायन्स जिओमध्ये ९.९९ टक्के भागभांडवल खरेदी करण्याचे जाहीर केले आहे. याच पार्श्वभूमीवर कंपनीने जिओसोबत एक करार केला असून तब्बल ४३ हजार ५७४ कोटी रुपयांची गुंतवणूक जिओमध्ये करण्याची माहिती दिली.

📌 हा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर फेसबुक रिलायन्स जिओमध्ये गुंतवणूक करणारी सर्वात मोठी शेअर होल्डर कंपनी ठरेल असे सांगितले जात आहे. रिलायन्स जिओनं बाजारात येताच अनेक कंपन्यांचे धाबे दणाणले होते. तसंच केवळ ४ वर्षांच्या कालावधीत रिलायन्स जिओनं ३८ कोटी ग्राहकांचा टप्पा गाठला होता.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...