थॅलेसिमिया लक्षणे आणि उपाय

थॅलेसेमिया हा एक रक्तसंबंधित अनुवांशिक आजार असून तो आई-वडिलांपासून मुलांना होतो.

🤔 *आजार कसा होतो?* : जर दोन्ही पालकांमध्ये यासंबंधी  जीन्स असल्यास, अनुवंशिक असणारा हा आजार 25 टक्‍के बालकांमध्ये संक्रमित होतो. यामुळे बालकाच्या शरीरात रक्ताची निर्मितीच होत नाही. त्यांना सुरुवातीला रक्त देण्याचा कालावधी कमी असला तरी वयानुसार तो वाढत जातो.

थॅलेसेमिया इंटरमेडिया (मायनर) आणि थॅलिसेमिया मेजर असे थॅलेसेमियाचे दोन प्रकार आहेत.

1. *थॅलेसेमिया मेजर* : या रुग्णांना नियमित रक्‍त भरावे लागते; कारण रोग्याचे शरीर पुरेसे हिमोग्लोबिन तयार करत नाही.

2. *थॅलेसेमिया मायनर* : बऱ्याच व्यक्तींना आपण मायनर थॅलेसेमिया आहे, याची माहितीच नसते. त्यामुळे विवाहपूर्व थॅलॅसेमियाची तपासणी केली, तर थॅलेसेमियाग्रस्त नवी पिढी तयार होणार नाही.

🤓 *उपचार काय आहे?* : ब्लड ट्रान्सफ्युजन (रक्तपुरवठा), अस्थीमज्जा प्रत्यारोपण, औषधे आणि शरीरातील अतिरिक्त लोह कमी करणे, पित्ताशय काढून टाकणे.

👀 *आजार टाळण्यासाठी काय करावे?* :

● सर्वात महत्वाचे म्हणजे लग्नापूर्वी युवक-युवतीच्या रक्ताची चाचणी करावी.
● जर युवक-युवती दोघेही थॅलेसेमिया वाहक असल्यास लग्न टाळावे.
● जर पती-पत्नीपैकी एकही थॅलेसेमियाग्रस्त असल्यास मुलाला हा आजार टाळण्यासाठी पुरेशी काळजी घ्यावी.
● जर गर्भवती माता थॅलेसेमिया वाहक/ रुग्ण असल्यास 10 आठवडयांनी तज्ज्ञ डॉक्टरांकडे तपासणी करावी.

No comments:

Post a Comment

Latest post

स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी

Q.1) प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते विजय थलापती यांनी कोणत्या नावाने स्वतःचा राजकीय पक्ष सुरू केला? उत्तर - तमिझगा वेत्री कळघम (TVK) Q.2) नुकत...