Saturday 18 June 2022

MPSC भूगोल प्रश्नसंच

1) पिकांमध्ये सौर किरणांचा जास्तीत जास्त प्रवेश होण्यासाठी पिकांची पेरणी ........................... करावी.
   1) पूर्व – पश्चिम दिशेने      2) उत्तर – दक्षिण दिशेने
   3) उत्तर – पूर्व दिशेने      4) दक्षिण – पश्चिम दिशेने
उत्तर :- 2

2) पीक वाढीसाठी पोषक खनिज द्रव्याची आवश्यकता दर्शविणारा पुढीलपैकी योग्य निकष निवडा.
   अ) एखाद्या घटकाच्या कमतरतेमुळे पिकाचे जीवनचक्र पूर्ण करण्यास अपयश येते.
   ब) एखाद्या घटकाची कमतरता फक्त तोच घटक पुरवून भरून काढता येते.
   क) घटकाचा परिणाम हा वाढीवर किंवा चयापचयावर व्हायलाच पाहिजे.
   ड) सदर घटक अल्प प्रमाणातच आवश्यक असतो.
   1) अ फक्त    2) अ व ब फक्त    3) अ, ब व क फक्त    4) अ, ब, क आणि ड
उत्तर :- 3

3) खालीलपैकी कोणती प्राथमिक खनिजे जमिनीमध्ये मोठया प्रमाणात आढळतात ?
   1) कॅलसाईट व डोलोमाईट    2) पायराईटस व मरकासाईट
   3) क्वार्टज्‍ व फेल्डस्पार्स      4) जिप्सम व सिडेराईट
उत्तर :- 3

4) वनस्पतीच्या तळाच्या पानापासून वरपर्यंत हरितद्रव्य (हिरवा रंग) नाहीसे होणे हे ....................... या मूलद्रव्याच्या कमतरतेचे
     लक्षण आहे.
   1) तांबे      2) मँगनीज    3) मॅग्नेशियम    4) गंधक
उत्तर :- 3

5) कोणत्या वनस्पती पोषणद्रव्यामुळे मुळांची वाढ चांगली होते, दुष्काळ सहन करण्याची क्षमता सुधारते व रोग प्रतिकारक शक्ती
     वाढते ?
   1) नत्र      2) स्फुरद      3) पालाश    4) कॅल्शियम
उत्तर :- 3

1) पिकांचे कोरडया हवामानात अवर्षण प्रतिकारण कशाशी संबंधित आहे ?
   1) उणे पाणी वापर क्षमता      2) अधिक पाणी वापर क्षमता
   3) जास्त पाणी वापर क्षमता    4) वरीलपैकी नाही
उत्तर :- 1

2) खालीलपैकी कोणत्या कार्यपध्दतीमध्ये अन्नद्रव्यांचे परिणाम ठरवणे खुपच अवघड ठरते.
   अ) पिकांनी घेतलेले      ब) पिकांनी न घेतलेले
   क) निक्षालनाव्दारे –हास झालेले    ड) मृदेच्या धूपेमुळे –हास झालेले
   1) अ    2) ब आणि क    3) अ आणि क    4) क आणि ड
उत्तर :- 4

3) सर्वसामान्य सुक्ष्मजंतूंची चांगली वाढ होण्यासाठी सामू मर्यादा ....................
   1) 4.5 – 8.5    2) 4 – 5    3) 4.5 – 6    4) 6 – 8
उत्तर :- 4

4) परिस्थितीकीय शेती ही ................... प्रकारातील पीक उत्पादन पध्दती आहे.
   अ) बहु – स्तरीय     ब) बहु – घडीय
   क) बहु – उपयोगी    ड) सर्वसमावेशक
   1) फक्त अ      2) फक्त ड   
   3) अ, ब आणि क    4) अ, ब,क आणि ड
उत्तर :- 4

5) कोणते मूलद्रव्य पीकाचा जोम व रोग प्रतीकारक क्षमता वाढविते ?
   1) नत्र    2) गंधक      3) पालाश    4) स्फुरद
उत्तर :- 3

1) अरनॉन यांचे मते किती अन्नद्रव्ये वनस्पतीचे निकोष वाढीसाठी गरजेची आहेत ?
   1) 4      2) 8      3) 16      4) 25
उत्तर :- 3

2) पिकांची पाण्याची गरज कशाशी संबंधित असते ?
   1) इव्हापोट्रान्सपीरेशन      2) पोटेनशियल अबसार्बशन कोईफीशीएन्ट
   3) ड्राय मॅटर कंन्टेट ऑफ द प्लँट    4) सॉईल मीनेरॉलॉजी
उत्तर :- 1

3) ज्यावेळी 30 पेक्षा जास्त कर्ब / नत्र गुणोत्तर असणारे सेंद्रिय पदार्थ जमिनीत घालतात त्यावेळी प्रारंभीच्या कुजण्याच्या टप्प्यात
    दरम्यामन नत्राचे ............................. होते.
   1) इममोबिलायझेशन    2) मिनरलायझेशन
   3) अमोनिफिकेशन    4) नायट्रीफिकेशन
उत्तर :- 1

4) कृषिपरिस्थितीकीय पध्दतीबाबत खालीलपैकी कोणती विधाने खरी आहेत ?
   अ) मशागतीची कमी तीव्रता    ब) पिकांची जास्त विभिन्नता
   क) जास्त पेट्रोलवर अवलंबून    4) मजुरांची कमी गरज
   1) फक्त अ    2) अ आणि ब    3) ब आणि ड    4) क आणि ड
उत्तर :- 2

5) बेसीक स्लॅगमध्ये उपलब्ध असणारी झाडांसाठी अन्नद्रव्ये ......................
   1) चुना व स्फुरद फक्त    2) लोखंड व चुना फक्त
   3) चुना व सिलिका फक्त    4) वरील सर्व
उत्तर :- 4

1) लोहाची कमतरता सर्वसाधारणपणे कोणत्या प्रकारच्या जमिनीत आढळते ?
   1) ॲसिडिक जमिनीत    2) कॅलकॅरीअस जमिनीत   
   3) सलाईन जमिनीत    4) अलकलाईन जमिनीत
उत्तर :- 2

2) खालीलपैकी कोणत्या मुलद्रव्याच्या कमतरतेची लक्षणे पिकाच्या शेवटच्या कळयावर दिसून येतात ?
   1) नत्र      2) पाळाश   
   3) जस्त    4) बोरॉन
उत्तर :- 4

3) कृषि क्षेत्रात खालीलपैकी कोणते घटक आरोग्य आणि वातावरणावर प्रतिकुल परिणाम करतात ?
   1) गांडुळखत आणि शेणखत    2) तणनाशके आणि किडनाशके
   3) सायकोसील आण एन.ए.ए.    4) निळे हिरवे शेवाळ
उत्तर :- 2

4) खालीलपैकी कोणते जीवाणूखत ऊस पिकामध्ये सर्वाधिक नत्र स्थिरीकरण करते ?
   1) अझॅटोबॅक्टर    2) अझोस्पीरीलियम 
   3) रायझोबीयम    4) ॲसीटोबॅक्टर
उत्तर :- 4

5) खालीलपैकी कोणत्या हवामान घटकानुसार लाँग – डे आणि डे – न्युटल वनस्पती ठरवल्या जातात ?
   1) हवेचा दाब    2) आर्द्रता   
   3) तापमान    4) सर्वात महत्त्वाचा घटक वर नमूद नाही
उत्तर :- 4

1) कुहरी बेसाल्ट खडक म्हणजे काय ?
   अ) लाव्हारसाने तयार झालेला खडक
   ब) पोकळयांनी युक्त बेसाल्ट खडक
   क) भेगामध्ये लाव्हारस थंड होऊन झालेला खडक
   1) फक्त अ    2) अ आणि ब   
   3) फक्त ब    4) वरील सर्व
उत्तर :- 2

2) कोणते झाड नत्र स्थिरीकरण करीत नाही ?
   1) गुलमोहर    2) बाभूळ     
   3) काळा सिरस    4) सुरू
उत्तर :- 4

3) खालीलपैकी कोणते पिक क्षारास कमी सहनशील आहे ?
   1) भात    2) ऊस      3) तीळ      4) कापूस
उत्तर :- 3

4) कम्पोस्ट खत तयार करण्यासाठी सेंद्रिय पदार्थातील कर्ब आणि नत्राचे गुणोत्तर किती असावे ?
   1) 10 : 1    2) 30 : 1    3) 60 : 1    4) 50 : 1
उत्तर :- 2

5) दख्खनच्या पठारावर आढळणा-या सुपीक, अपुरा निचरा आणि चोपन व खारवटपणास प्रवृत्त होणारी जमीन कोणती ?
   1) खोल काळी जमीन      2) लाल जमीन
   3) तपकिरी जमीन      4) पोयटयाची जमीन
उत्तर :- 1

1) पुढील दोन विधानांपैकी कोणत योग्य आहे ?
   अ) करेवाज् जम्मू व काश्मिर खो-यातील सरोवर जन्य भू आकार आहेत.
   ब) पालमपूर, पुलवामा, कुळगांव येथील करवाज् उच्च प्रतीच्या आक्रोडासाठी ओळखले जातात.
   1) केवळ अ    2) केवळ ब    3) दोन्ही      4) एकही नाही
उत्तर:- 1

2) व्दिपगिरी काय आहे ?
   1) वाळवंटी प्रदेशात वा-याच्या खनन कार्यामुळे तयार झालेला भूआकार
   2) नदीच्या खनन कार्यामुळे तयार झालेला भूआकार
   3) वाळवंटी प्रदेशात वा-याच्या भरण कार्यामुळे तयार झालेला भूआकार
   4) हिमनदीच्या भरण कार्यामुळे तयार झालेला भूआकार
उत्तर :- 1

3) खालील विधाने पहा :
   अ) ॲरीनेशियस खडक हे स्तरीत प्रकारचे खडक आहेत.
   ब) ॲरीनेशियस खडकामध्ये वाळूचे प्रमाण जास्त असते.
   1) फक्त विधान अ बरोबर आहे.      2) फक्त विधान ब बरोबर आहे.
   3) विधाने अ आणि ब बरोबर आहेत.    4) विधाने अ आणि ब बरोबर नाहीत.
उत्तर :- 3

4) महाराष्ट्रात अधोमुखी व ऊर्ध्वमुखी लवण स्तंभ ................ येथे अहमदनगर जिल्ह्यात आढळतात.
   1) कान्हूर    2) राहुरी      3) कर्जत      4) शिरूर
उत्तर:- 1

5) खालीलपैकी कोणते मायक्रोफौना आहे ?
   1) बॅक्टेरिया    2) निमॅटोडस्    3) ॲक्टीनोमायसेटस्    4) फंगी
उत्तर:- 2

1) जोडया जुळवा.
   अ) हमादा    i) खडकाळ वाळवंट
   ब) रेग      ii) वाळूचे वाळवंट
   क) अर्ग    iii) दगडाळ वाळवंट
   ड) दुर्भूमि    iv) घळपाडी धूप
  अ  ब  क  ड
         1)  i  ii  iii  iv
         2)  i  iii  ii  iv
         3)  iv  ii  iii  i
         4)  iv  iii  i  ii
उत्तर :- 2

2) गाभ्याची घनता ही प्रावरणाच्या घनतेच्या दुपटीपेक्षा जास्त आहे परंतू घनफळ व वस्तूमान हे पृथ्वीच्या एकूण घनफळाच्या
      अनुक्रमे .................. आणि ......................... आहे.
   1) 16% आणि 32%    2) 12.3% आणि 13.3%    3) 2900 ते 6371    4) 5.5% आणि 10.00%
उत्तर :- 1

3) पृथ्वीच्या अंतरंगातील तापमान पृष्ठभागापासून खोल जावे तसे ...............................
   1) वाढत्या प्रमाणात कमी होते      2) वाढत्या प्रमाणात वाढते
   3) सारख्या प्रमाणात वाढते      4) घटत्या प्रमाणात वाढते
उत्तर :- 4

4) खालील विधाने पहा.
   अ) पृथ्वीची सरासरी घनता 5.12 ग्रॅम प्रति घन सें. मी. आहे.
   ब) पृथ्वीच्या भूकवचाची घनता 2.8 ग्रॅम प्रति घन सें. मी. आहे.
   1) फक्त विधान अ बरोबर आहे.      2) फक्त विधान ब बरोबर आहे.
   3) विधाने अ आणि ब बरोबर आहेत  .    4) विधाने अ आणि ब बरोबर नाहीत.
उत्तर :- 2

5) खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही ?
   1) शिलारसाच्या उष्णतेमुळे चुनखडीचे रूपांतर ग्रॅफाइटमध्ये होते.
   2) अँथ्रासाइट हा रूपांतरित खडक आहे.
   3) वनस्पतीपासून तयार झालेल्या खडकात खनिजतेलाचे साठे आढळतात.
   4) डाइक खडक शिलारसापासून तयार होतात.
उत्तर :- 1

1) पृथ्वीचे कवच विविध खडकांनी बनलेले आहे. खडकांबाबत कोणते विधान चुकीचे आहे ?
   1) काही वेळा लावा रस पृथ्वीत खोल थंड होतो. लावा रस हळूवार थंड होतो म्हणून बारीक कण तयार होतात. ग्रॅनाइट या
       प्रक्रियाचे उदाहरण आहे. ते इग्नज (ईग्निअस) खडक आहेत.
   2) मसाल्यांचे वा धान्य दळण्या / कुटण्यासाठी वापरले जाणारे दगड ग्रॅनाईटचे असतात.
   3) लाल किल्ला गाळाच्या (सेडिमेंटरी) दगडांनी बनलेला आहे.
   4) ताजमहाल रुपांतरित (मेटॅमॉर्फिक) दगडांनी बनलेला आहे.
उत्तर :- 1

2) पृथ्वीच्या अंतरंगातील पदार्थातील प्रमुख घटक व त्यांचे प्रमाण (17 कि.मी. खोलीपर्यंत)
   अ) ऑक्सिजन      i) 28.0
   ब) सिलिकॉन      ii) 8.1 
   क) ॲल्युमिनियम    iii) 47.0
   ड) लोह      iv) 11.1
   इ) कॅल्शिअम, सोडियम,    v) 9.5
        पोटॅशियम व मॅग्नेशिअम 
  अ  ब  क  ड  इ
         1)  i  iii  v  iv  ii
         2)  iii  i  ii  v  iv
         3)  i  ii  v  iv  iii
         4)  iii  ii  i  v  iv
उत्तर :- 2

3) खालील विधानांवर विचार करा.
   अ) समुद्रतट – भरतीच्या पाण्याची कमाल मर्यादा व ओहटीच्या पाण्याची किमान मर्यादा यातील भाग.
   ब) अपतट – ओहटीच्या किमान मर्यादेपलीकडील समुद्राच्या दिशेकडेच्या खंडात उताराचा उथळ भाग.
   क) अग्रतट – ओहटीच्या किमान मर्यादेपासून भरतीच्या सरासरी मर्यादेपर्यंतचा भाग.
   ड) पश्च तट – भरतीच्या सरासरी मर्यादेपासून किना-यावरील समुद्रकडयांच्या पायथ्या पर्यंतचा भाग.
   1) अ आणि ब बरोबर    2) अ, ब आणि क बरोबर   
   3) ब, क आणि ड बरोबर    4) अ, ब, क आणि ड बरोबर
उत्तर :- 4

4) खालीलपैकी कोणते भुरूप हिमनदीनिर्मित भूदृश्याचा भाग नाही ?
   1) हिमोढ कटक    2) हिमोढगिरी    3) मेषशिला    4) वरील एकही नाही
उत्तर :- 4

5) पॉवेलव्दारा वर्णित अनुवांशिक वर्गीकरणाच्या आधारावर डेवीसने उताराला अनुसरून, दरीच्या प्रकारांचे वर्गीकरण विकसित
     केले, ते कोणते ?
   1) युवा, प्रौढ, वृध्द        2) अनवुर्ती, परावर्ती, प्रत्यानुवर्ती, नवानुवर्ती, अक्रमवर्ती
   3) अपनती, अभिनती, भ्रंशरेखा संधी    4) पुनर्वर्ती, अध्यारोपी, निम्मजीत, पुनर्जिवीत
उत्तर :- 2

1) इ.स. 1992 मध्ये भूखंडवहनाची  संकल्पना कोणी मांडली ?
   1) अ. व्हॉन हंबोल्ट    2) अ. वेबर    3) अ. वेगनर    4) कार्ल रिटर
उत्तर :- 3

2) ‘व्ही’ आकाराच्या द-या, घळई, जलप्राप ही भुरूपे खालीलपैकी कोणत्या कारणामुळे निर्माण होतात ?
   1) नदी        2) हिमनदी    3) समुद्रलाटा    4) भूमिगत पाणी
उत्तर :- 1

3) पृथ्वीच्या अंतर्गत भागात वेगवेगळे गुणधर्म असलेले तीन विभाग ओळखले गेले उदा. कवच, प्रावरण व गाभा.
   अ) सीयाल व सीमा यांच्या मधील घनतेत बदल होणा-या क्षेत्रास कॉनरॅड विलगता म्हणून ओळखले जाते.
   ब) भूकंप लहरींच्या गतीमध्ये अचानक बदल होणा-या क्षेत्रास मोहो विलगता म्हणून ओळखले जाते.
   क) प्रावरण – गाभा सीमारेषा ही गटेनबर्ग विलगतेने ठरविली जाते.
         वरील विधानांपैकी कोणते विधान /ने सत्य आहेत ?
   1) अ फक्त      2) ब आणि क फक्त  3) अ आणि क फक्त  4) अ, ब आणि क
उत्तर :- 4

4) ‘यु’ आकाराच्या दरीच्या निर्मितीसाठी कोणता पर्याय बिनचूक आहे ?
   अ) नदीच्या खनन कार्यामुळे तयार होते.    ब) नदीच्या संचयन कार्यामुळे तयार होते.
   क) हिमनदीच्या खनन कार्यामुळे तयार होते.    ड) हिमनदीच्या संचयन कार्यामुळे तयार होते.
   1) फक्त अ      2) अ आणि ब    3) अ आणि ड    4) फक्त क
उत्तर :- 4

5) खडक तीन प्रकारचे असतात.
     अग्नीज (इग्नीअस), गाळाचे (सेंडिमेंटरी), व रूपांतरित (मेटॅमॉर्फिक)
      धातु खनिज सर्वसाधारणपणे कोणत्या खडकात आढळतात ?
   1) अग्नीज व गाळाच्या खडकांत    2) गाळाच्या व रूपांतरित खडकांत
   3) अग्नीज व रूपांतरित खडकांत    4) केवळ अग्नीज खडकांत
उत्तर :- 3

1) आजच्या अनेक खंडांच्या निर्मितीच्या अगोदर एकजिनसी खंड होता त्याचे नाव काय होते ?
   1) गोंडवाना    2) लॉरेंशिया    3) पॅन्जिया    4) टेथिस
उत्तर :- 3

2) यारदांग हे भूरूप कोणत्या प्रदेशात  आढळते ?
   1) महासागरीय    2) वाळवंटी    3) आर्द्रप्रदेश    4) हिमाच्छादित
उत्तर :- 2

3) पृथ्वीचे भूकवच आणि मध्यावरण यांच्या दरम्यान ......................... ही विलगता आढळते.
   1) मोहोरव्हिसीक  2) गटेनबर्ग   
   3) विचर्ट    4) भूभौतीक
उत्तर :- 1

4) ...................... “मनुष्य वंशाचा पाळणा आहे. मनूभाषेचे जन्मस्थान आहे. इतिहासाची जननी आहे, आख्यायिकेची आजी आहे
     व परंपरांची मोठी आजी आहे”.
      मार्क टवेन कोणत्या देशाबाबत बोलत आहे ?
   1) अमेरिका    2) भारत      3) इंग्लंड      4) ग्रीस
उत्तर :- 2

5) पृथ्वीच्या अंतरंगातील गाभाच्या रचनेविषयी खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ?
   1) पृथ्वीच्या अंतरंगाचा गाभा सियालपासून बनलेला आहे.
   2) पृथ्वीच्या अंतरंगाचा गाभा सायमापासून बनलेला आहे.
   3) पृथ्वीच्या अंतरंगाचा गाभा निफेपासून बनलेला आहे.
   4) पृथ्वीच्या अंतरंगाचा गाभा कठीण खडकापासून बनलेला आहे.
उत्तर :- 3

1) भौगोलिक माहिती यंत्रणेमध्ये लहान भाग ........................ प्रकारे दाखविला जातो.
   1) बिंदू      2) रेषा      3) बहुभुजाकृती    4) वरीलपैकी एकही  नाही
उत्तर :- 3

2) दृष्यमान तरंग लहरीची एक श्रेणी अंदाजे ...................... इतकी असते.
   1) 0.1 ते 0.7 µm    2) 0.4 ते 0.7 µm   
   3) 1.4 ते 1.7 µm    4) 4 ते 7 µm
उत्तर :- 2

3) दृष्य आणि अवरक्त वर्ण पट्टयामधून मिळणा-या प्रतिमांचे वर्णन अवकाशिक, वर्णपटलीय आणि किरणोत्सार – मापन वियोजन
     याव्दारे करता येणे हे दूरसंवेदन उपकरणांचे मुख्य वैशिष्टय आहे. यामध्ये ...................
   अ) अवकाशिक वियोजन म्हणजे विशिष्ट उंचीवरून विशिष्ट वेळी अशा उपकरणातून दिसणारा भू – भाग होय.
   ब) अंकीय उपग्रह प्रतिमेमधील एक चित्रांश म्हणजे विविक्षित क्षणी दिसणारे क्षेत्र होय.
   क) वर्णपटलीय वियोजन म्हणजे वर्णपटलातील विशिष्ट वर्णपट्ट्यांची रुंदी होय.
   ड) वर्णपटलाच्या काही भागातील अरुंद वर्णपट्टयांव्दारे प्राप्त प्रतिमामध्ये विविध भू – रुपातील फरक ओळखणे शक्य होत नाही.
        वरीलपैकी कोणते / ती विधान / ने बरोबर आहे / त ?
   1) फक्त अ    2) अ, ब आणि क    3) अ, क आणि ड    4) फक्त ड
उत्तर :- 2

4) समुद्रकडा हे भूमीस्वरूप समुद्र लाटांच्या ..................... कार्यामुळे निर्माण होतो.
   1) संचयन    2) खनन      3) वहन      4) यापैकी नाही
उत्तर :- 2

5) ज्या खडकामध्ये 65 टक्के पेक्षा जास्त सिलिकाचे प्रमाण असते. त्यास काय म्हणतात ?
   1) बेसीक खडक      2) ॲसीडिक खडक 
   3) मेट्यॉमॉरफीक खडक    4) प्लुटॉनिक खडक
उत्तर :- 2

1) पुढील दोन विधानांपैकी कोणत योग्य आहे ?
   अ) दृश्यमान रेडिओ लहरींची श्रेणी अंदाजे 0.7 ते 0.9 मायक्रोमीटर इतकी असते.
   ब) एक पूर्ण जागतिक स्थान निश्चिती यंत्रणेकरता किमान 24 उपग्रह समूहांची गरज असते.
   1) केवळ अ    2) केवळ ब    3) दोन्ही      4) एकही नाही
उत्तर :- 2

2) ................... आभासी रंगीत पट्टे हिमवर्षाव, बर्फ आणि ढग यांना वेगळे करतात ?
   1) निळा (लाल) दोन भिन्न लघुलहर अवरक्त पट्टे (हिरवा आणि निळा)
   2) लघुलहर अवरक्त (लाल), अवरक्त नजीक (हिरवा) आणि हिरवा (निळा)
   3) अवरक्त नजीक (लाल), हिरवा (निळा), लाल (हिरवा)
   4) यापैकी एकही नाही
उत्तर :- 1

3) ...................... उपग्रह सध्या कार्यरत आहे.
   1) IRS – 1D    2) IRS – P4   
   3) RISAT – 1    4) IRS – 1C
उत्तर :- 3

4) पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या नावाने ओळखला जातो ?
   1) सिआल    2) सायमा    3) निफे      4) शिलावरण
उत्तर :- 3

5) खालील वैशिष्टये कोणत्या भूकंप लहरींची आहेत ?
   अ) भूकंप केंद्रापासून सरळ दिशेने प्रवास करतात आणि भूपृष्ठावर येतात.
   ब) जास्त घनतेच्या भागातून जाताना लहरींचा वेग वाढतो.
   क) द्रव पदार्थातून जाताना लहरींचा वेग मंदावतो.
   1) प्राथमिक लहरी    2) दुय्यम लहरी    3) भूपृष्ठ लहरी    4) सामान्य लहरी
उत्तर :- 1

1) दूर संवेदन तंत्रामध्ये वर्णपटलाच्या विविध पट्ट्यातील कंप्रतीच्या सहाय्याने केल्या जाणा-या समीक्षण पध्दतीस बहुवर्णपटलीस
     समीक्षण असे म्हणतात.
   अ) भारतात एम.एस.एस. स्पेस अप्लीकेशन सेंटर, अहमदाबाद या संस्थेने विकसित केली आहे.
   ब) एम.एस.एस. मध्ये प्रतिमांचे चित्र काढण्याची व बीनतारी संदेशाव्दारे वर्णक्रम पाठविण्याची एकत्रित क्षमता एकाच उपकरणात
        असते.
   क) बहुवर्णपटलीय समीक्षणामध्ये संदेश सोडून ते भू – पृष्ठावरून परावर्तित होऊन आल्यावर नोंद केली जाते.
   ड) बहुवर्णपटलीय समीक्षणामध्ये कॅमेरे आणि व्हिडीकॉन यांचा उपयोग माहिती संकलनासाठी केला जातो.
        वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
   1) अ आणि ब    2) ब आणि क    3) अ आणि क    4) ब आणि ड
उत्तर :- 1

2) खालीलपैकी कोणते विधान बहुवर्णक्रमी प्रतिमांना लागू नाही ?
   1) विद्युतचुंबकीय वर्णक्रमांच्या विरुध्द बाजुला विशिष्ट कंपन संख्या निर्माण झाल्यावरच बहुवर्णक्रमी प्रतिमा माहिती प्रतिबिंबीत
       करतात.
   2) त्या फक्त प्रत्येक पिक्सेलवर पडणा-या किरणोत्साराच्या तीव्रतेचीच नोंद ठेवतात.
   3) दूरसंवेदनाव्दारे प्राप्त होणारी मुख्य प्रतिमा आहे.
   4) याव्दारे वर्णक्रमी प्रतिमा अधिक माहिती संकलित करू शकतात.
उत्तर :- 3

3) विविध विद्याशाखामधील संकल्पना आणि सार यांच्या समावेशाव्दारे भौगोलिक माहिती प्रणाली हे तंत्र विकसित करण्यात आले
    आहे. या तंत्रामध्ये .......................
   अ) विविध स्त्रोतामधून प्राप्त झालेली सांख्यिकीय माहिती थेटपणे वापरता येते.
   ब) अंक स्वरुपात सांख्यिकीय माहितीची नोंदणी  करणे ही प्राथमिक गरज आहे.
   क) जी.पी.एस किंवा दुय्यम स्त्रोताव्दारे मिळालेली सांख्यिकीय माहिती वापरता येत नाही.
   ड) विविध स्वरूपातील सांख्यिकीय माहिती वापरण्यासाठी प्रथम ती संगणकावर घेणे आवश्यक असते.
        वरीलपैकी कोणते / कोणती विधान / ने बरोबर आहे / आहेत ?
   1) अ आणि क    2) ब आणि ड    3) क आणि ड    4) फक्त ब
उत्तर :- 2

4) जी.पी.एस. च्या माध्यमातून भूस्थिती मोजण्याच्या माध्यमास काय म्हणतात ?
   अ) उपग्रह व्याप्ती  ब) उपग्रह कक्ष    क) उपग्रह अंतर    ड) उपग्रह धारक
        वरीलपैकी कोणते / ती विधान / ने बरोबर आहे / त ?
   1) फक्त अ    2) ब फक्त    3) क आणि ड फक्त  4) वरील कोणतेही नाही
उत्तर :- 1

5) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?
   अ) स्पॉट अँड क्विकबर्ड उपग्रह प्रणाली ही निष्क्रीय सुदूर संवेदनाचे उदाहरण आहे.
   ब) सोळाव्या भारतीय सुदूर संवेदन उपग्रह ओशनसॅट – 2 चे प्रक्षेपण दि. 23 सप्टेंबर 2009 रोजी पी.एस.एल.व्ही. 15 या प्रक्षेपण
         यानाव्दारे करण्यात आले.
   1) केवळ अ    2) केवळ ब    3) दोन्ही      4) एकही नाही
उत्तर :- 1

1) आभासी रंग प्रतिमांमध्ये लाल रंग कोणत्या रंगात दिसतो ?
   1) निळया    2) काळया    3) हिरव्या    4) नारंगी
उत्तर :- 3

2) ध्रुवीय कक्षेत भ्रमण करणा-या आणि सूर्यानुगामी माहितीचे संकलन करणे जीवशास्त्रीय आणि पर्यावरण शास्त्रीय अभ्यासास
     उपयुक्त असते कारण :
   अ) असे उपग्रह एखाद्या ठिकाणास विशिष्ट वेळीच पुन:पुन्हा भेट देत असतात.
   ब) असे उपग्रह एखाद्या ठिकाणाची निरीक्षणे सातत्याने सलगपणे घेत असतात.
   क) अशा उपग्रहांचे पृथ्वीपासूनचे अंतर कमी असते.
   ड) असे उपग्रह खूप उंचीवर प्रस्थापित केलेले असतात.
        वरीलपैकी कोणते / कोणती विधान / ने बरोबर आहे / आहेत ?
   1) फक्त अ    2) अ, ब आणि ड    3) अ आणि ड    4) ब आणि क
उत्तर :- 1

3) उपग्रहाच्या सहाय्याने पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाची स्थाननिश्चिती करण्याच्या तंत्राला जागतिक स्थान निश्चिती प्रणाली
     (GPS) असे संबोधले जाते. या तंत्रामध्ये .......................
   अ) एखाद्या ठिकाणाची स्थाननिश्चिती अक्षांश, रेखांश आणि उंचीच्या संदर्भात केली जाते.
   ब) अंतराचे मापन फक्त दिवसा आणि चांगल्या हवामानातच शक्य असते.
   क) भूकंप क्षेत्राचे नेमके निर्धारीकरण करण्याची क्षमता आहे.
   ड) किना-यावर प्रमुख स्टेशन ठेवून अवकाल GPS (DGPS) च्या सहाय्याने समुद्रातील जहाजांचे स्थान निश्चित करता येते.
         वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
   1) अ, ब आणि क  2) अ आणि ड    3) ब, क आणि ड    4) अ, क आणि ड
उत्तर :- 4

4) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?
   अ) सूक्ष्म लहरी सुदूर संवेदना ज्यांची तरंग लांबी 3 मायक्रोमीटरपेक्षा जास्त असते त्या ढगांनी आच्छालेल्या प्रदेशाच्या सुदूर
         संवेदनाच्या अभ्यासासाठी मुख्यत्वेकरून वापरल्या जातात.
   ब) 2013 साली भारताच्या पूर्व किनारपट्टीवर धडकलेल्या फायलिन या चक्रीवादळाच्या हालचालीच्या संदर्भातील पूर्व सूचनांसाठी
        कार्टोसॅट – I या उपग्रह प्रतिमांचा उपयोग केला गेला.
   1) केवळ अ    2) केवळ ब    3) दोन्ही      4) एकही नाही
उत्तर :- 1

5) पुढील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?
   अ) सुदूर संवेदन प्रणाली नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेल्या ऊर्जेचे मापन करते त्याला सक्रीय सेन्सर्स असे म्हणतात.
   ब) सुदूर संवेदन प्रतिमा ह्या मुख्यत: मल्टीस्पेक्ट्रल असतात आणि एस्टर प्रतिमा ह्या 7 स्पेक्ट्रल बँडच्या असतात.
   1) केवळ अ    2) केवळ ब    3) दोन्ही      4) एकही नाही
उत्तर :- 4

1) लोकसंख्या संक्रमणाच्या दुस-या टप्प्यावर
   1) जन्मदर उच्च परंतु मृत्यूदर वेगाने घटतो.      2) जन्मदर कमी परंतु मृत्यूदर वेगाने वाढतो.
   3) मृत्यूदर अधिक राहतो परंतु जन्मदर वेगाने घटतो.    4) वरील एकही नाही
उत्तर :- 1

2) प्रकाशामध्ये (दृश्य) .......................... असतात.
   1) लघु लांबीच्या व उच्च वारंवारीता लहरी    2) दीर्घ लांबीच्या व निम्न वारंवारीता लहरी
   3) लघु लांबीच्या व निम्न वारंवारीता लहरी    4) दीर्घ लांबीच्या व उच्च वारंवारीता लहरी
उत्तर :- 1

3) .................... हे सर्वोत्तम आणि व्यापारी दृष्टया सर्वाधिक वापरले जाणारे भौगोलिक माहिती प्रणालीतील प्रतिमा प्रक्रियण  
     कार्यक्रम सामग्रीसंच आहे.
   1) इरदास (ERDAS)    2) एक्सले (EXCEL)   
   3) मॅटलॅब (MATLAB)    4) फोटोस्मार्ट (PHOTOSMART)
उत्तर :- 1

4) त्रिमिती दृश्य तयार करण्यासाठी दोन व्दिमितीय छाया चित्रांचे सुमारे ...............% आच्छादन त्रिमितीदर्शी खाली मांडावे लागते.
   1) 60      2) 90      3) 45      4) 30
उत्तर :- 1

5) ................. छायाचित्रण हे सर्वसाधारणरित्या एकेरी भिंग मांडणीच्या छायात्रिकाव्दारे घेतात अशा छायाचित्रांचा वापर सुदूर
     संवेदन आणि भू मानचित्र अभ्यासात होतो.
   1) तिरकस    2) समतल   
   3) विस्तृतकोन    4) लंब रूप
उत्तर :- 4

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी सराव प्रश्न    24 मे 2024

प्रश्न.1)  NS-25 मिशनच्या क्रू सदस्यांपैकी कोण पहिला भारतीय अंतराळ पर्यटक बनणार ? उत्तर – गोपी थोटाकुरा प्रश्न.2) आयपीएल मध्ये ८ हजार धाव...