Saturday 8 January 2022

महत्त्वाच्या दऱ्या.


🧩काश्मीर दरी :

🅾पीरपंजाल व मुख्य हिमालयाच्या झास्कर रांगेदरम्यान ही प्रसिद्ध काश्मीर दरी आहे. काश्मीर दरीची लांबी सुमारे १३५ किमी तर रुंदी सुमारे ८० किमी इतकी आहे.

🧩कांग्रा दरी :

🅾हिमाचल प्रदेशातील ही दरी धौलाधर रांगेच्या पायथ्यापासून बियास नदीच्या दक्षिण भागापर्यंत पोहचलेली आहे.

🧩कुलू दरी :

🅾रावी नदीच्या उध्र्व प्रवाहात कुलू दरी आहे.

🧩काठमांडू दरी :

🅾नेपाळमध्ये महाभारत रांगेच्या उत्तरेला काठमांडू दरी आहे.

🧩शिवालिक रांगा/ बाह्य हिमालय (Outer Himalaya) :

🅾हिमालय पर्वताच्या सर्वात बाहेरील रांग म्हणजे शिवालिक रांग. या रांगेलाच ‘बाह्य हिमालय’ असे म्हणतात.

🅾हिमालयाच्या इतर रांगेच्या उत्पत्तीनंतर शिवालिक टेकडय़ांची निर्मिती झाल्याने हिमालयातील नद्यांनी वाहून आणलेला गाळ या ठिकाणी साठत गेला व येथे सपाट मदानी प्रदेशाची निर्मिती झाली यालाच ‘डून’ असे म्हणतात .

🅾उदा. डेहराडून (उत्तराखंड), उधमपूर व कोटला (जम्मू व काश्मीर), शिवालिक रांगांच्या पूर्व भागात नेपाळपर्यंत वनांचे दाट आच्छादन आहे, तर पश्चिमेकडे हे आच्छादन कमी होताना दिसते.

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

No comments:

Post a Comment

Latest post

जगाच्या भुगोलाबद्दल थोडी माहिती

➡️ जगात क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा सातवा क्रमांक लागतो. ➡️ भारताने जगाच्या एकूण क्षेत्रापैकी 2.42 टक्के क्षेत्र व्यापलेले आहे. ➡️ भार...