भारतमातेच्या रक्षणासाठी एचएएल सज्ज.

🔰गलवान खोऱ्यातील वाद शिगेला पोहोचला असताना भारतीय संरक्षण क्षेत्रात लढाऊ विमान बनविण्यात अग्रणी असलेल्या ओझर येथील हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड सुद्धा भारताच्या संरक्षणासाठी मैदानात उतरली आहे.

🔰देशाच्या संरक्षण क्षेत्रात लष्कराला अत्याधुनिक हेलिकॉप्टर बनवून देण्यात एचएएलचा हातखंडा आहे.
भारत-चीन सीमेवरील वाढता तणाव पाहता युद्धजन्य परिस्थितीत ‘सुखोई 30’ हे अत्याधुनिक लढाऊ विमान खरी ताकद सिद्ध करणार आहे.

🔰तर त्यामुळेच एच.ए.एल.ला देखील अप्रत्यक्षिरत्या हायअलर्टवर आल्याचे सांगितले जात आहे. देशभरात आज जितकी एअरफोर्स केंद्र आहेत तेथे असलेल्या लढाऊ विमानांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी गेलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना तशा सूचना देण्याचे धोरण लवकरच अवलंबून त्यादृष्टीने योग्य पावले उचलली जाणार आहेत.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी प्रश्नसंच

1.कोणत्या आशियाई देशाने लिथियम आणि ग्रेफाइटसह 20 गंभीर खनिज ब्लॉक्सचा ई-लिलाव सुरू केला आहे? [अ] श्रीलंका [ब] इंडोनेशिया [क] भारत [डी] बांगल...