Thursday 21 October 2021

ज्ञानेंद्रिये (Sensory Organs):-

◆ प्राण्यांमध्ये पाच प्रकारची ज्ञानेंद्रिये असतात- डोळे, नाक, कान, त्वचा व जीभ.
■ डोळे (Eyes):
◆ ८० टक्के जगाचे ज्ञान आपल्याला डोळ्यांमुळे होते.
◆ पापणीची सतत उघडझाप चालू असते. त्याद्वारे अश्रू डोळ्यावर समप्रमाणात पसरविले जाऊन डोळा ओलसर राहतो.
◆ अश्रू हे सोडियम क्लोराईड व सोडियम बाय कार्बोनेटचे मिश्रण असते. त्यामध्ये लायसोझाइम (Lysozyme) नावाचे विकर असते. जे ऍन्टीसेप्टीक म्हणून काम करते.
========================

■ बुबुळ (Cornea):-
◆ नेत्रदानामध्ये डोळ्याचा हा भाग काढला जातो. मृत्यूनंतर तो चार तासाच्या आत काढणे गरजेचे असते.
◆ बुबुळ रोपणास Keratoplasty असे म्हणतात. मानवी अवयवाचे पहिले यशस्वी रोपण (Transplantation) बुबुळाचे करण्यात आले होते. ते एक्वर्ड कौराड झिर्म (Edward Kourad Zirm) या शास्त्रज्ञाने 7 डिसेंबर 1905 रोजी केले होते.
========================

■ दृष्टिपटल (Retina):
◆ हा डोळ्याचा पडदा असून वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलावर तयार होते. वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलावर उलटी (inverted & Reversed) पडत असते. मात्र, मेंदूमार्फत तिचे आकलन सुलट केले जाते.
========================

■ दृष्टीसातत्य :
◆ वस्तूची प्रतिमा दृष्टिपटलावर १/१६ सेकंदासाठी राहत असते. त्याच्या आतच त्याच वस्तूची प्रतिमा पुन्हा पडल्यास त्या दोन प्रतिमांमधील फरक जाणवून येत नाही. याला दृष्टिसातत्य असे म्हणतात. त्यामुळेच सिनेमाच्या पडद्यावर हलणारी चित्रे पाहणे शक्य होते.
========================

■ दृष्टिदोष (Defects Of Vision):
◆ दृष्टिदोष हे प्रामुख्याने नेत्रभिंगातील संरचनात्मक दोषामुळे निर्माण होत असतात.
१) निकटदृष्टिता / हृस्वदृष्टी (Myopia/ Near-sightedness):
◆ जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात. तर लांबच्या वस्तू अस्पष्ट दिसतात.
◆ डोळ्याचा आकार मोठा, लांबट व चपटा होतो, त्यामुळे वस्तूची प्रतिमा पडद्याच्या अलीकडेच पडते.
◆ प्रकाशकिरणांचे केंद्रीकरण पडद्याच्या अलीकडेच काही अंतरावर होते. अर्थात, प्रकाशकिरण ज्यावेळी पडद्यावर पोहोचतात त्यावेळी ते विकेंद्रित झालेले असतात.
उपाय: अंतर्गोल भिंगाचा चष्मा
========================

२) दूरदृष्टिता/ दीर्घदृष्टी (Hypermetropia/Longsightedness):
◆ दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात, तर जवळच्या वस्तू अस्पष्ट दिसतात.
◆ डोळ्याचा आकार मोठा व उभट होतो. त्यामुळे प्रतिमा पडद्याच्या मागे पडते.
उपाय: बहिर्गोल भिंगाचा चष्मा.
========================

३) विष्मदृष्टी / अबिंदूकता (Astigmatism):
◆ बुबुळाच्या किंवा भिंगाच्या किंवा दोघांच्या वक्रतेमध्ये कमी -जास्तपणा निर्माण झाल्यास हा दोष निर्माण होतो.
◆ त्यामुळे वस्तूपासून येणाऱ्या प्रकाशकिरणांचे केंद्रीकरण पडद्यावर एकाच ठिकाणी न होता दोन किंवा अधिक ठिकाणी होते. त्यामुळे वस्तू अस्पष्ट दिसतात.
◆ हा दोष ह्रस्व व दीर्घदृष्टी या दोन्हींमध्ये आढळू शकतो.
उपाय: दंडगोलाकार भिंगाचा चष्मा.
========================

४) वृध्ददृष्टिता/ चाळीसी (Presbyopia):
◆ वाढत्या वयामुळे होणार दोष दूरदृष्टीतेचा एक प्रकार समायोजी स्नायू दुर्बल बनल्याने भिंगाच्या समायोजन शक्तीमध्ये हळूहळू होणाऱ्या कमतरतेमुळे निर्माण होतो, त्यामुळे जवळच्या वस्तू सुस्पष्ट दिसत नाहीत.
उपाय: वेगवेगळ्या प्रकारचे चष्मे.
========================

No comments:

Post a Comment

Latest post

केंद्रीय दक्षता आयोग (Central Vigilance Commission)

🔻भारतातील एक सर्वोच्च सरकारी संस्था जी देशाच्या सार्वजनिक प्रशासनात अखंडता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्त्व वाढवण्यासाठी जबाबदार आहे. 🔻स्थ...