Monday 1 June 2020

अमेरिकेने WHO सोबतचे तोडले सर्व संबंध.

🔰सध्या जगभरातल करोनानं थैमान घातलं आहे. अशा परिस्थितीत अनेक देश या संकटाचा सामना करत आहेत.

🔰तरदुसरीकडे या संकटाला चीन जबाबदार असल्याचं म्हणत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवर हल्लाबोल केला होता.

🔰तर त्यातच जागतिक आरोग्य संघटना ही चीनच्या हातची बाहुली असल्याचं म्हणत त्यांनी संघटनेसोबत सर्व संबंध तोडण्याचाही इशारा दिला होता.

🔰दरम्यान, शुक्रवारी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक आरोग्य संघटनेसोबत असलेले सर्व संबंध तोडत असल्याची घोषणा केली.

🔰तसेच ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी करोना व्हायरसच्या संकटात योग्यरित्या काम न केल्याचा ठपका ठेवत जागतिक आरोग्य संघटनेचा निधी रोखण्याचा निर्णय घेतला होता.

🔰तर जोवर करोनाचा प्रसार कमी करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या भूमिकेची समिक्षा केली जात नाही तोवर हा निधी थांबवण्यात येणार असल्याचं ट्रम्प म्हणाले होते. तसंच त्यांनी जागति आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याचा इशाराही दिला होता.

No comments:

Post a Comment

Latest post

हिमालयातील 8000 मी.उंचीपेक्षा जास्त उंची असणारी शिखरे..

-----------------======---------------------- शिखर               उंची(मी)             स्थान ---------------------------------------------...