Tuesday, 28 July 2020

सन्याशांचे बंड

कालखंड :- इ.स. 1763 ते 1800

🖍  इंग्रजांनी भारतात अापली सत्ता प्रथम बंगालमध्ये स्थापन केल्यामुळे इंग्रजांविरोधी उठाव देखील प्रथम बंगाल व नंतर बिहार, ओरीसा या भागात झाले.

🖍 बंगालमधील सन्याशी हे गिरी संप्रदायाचे असून मूळ शंकराचाऱ्यांचे अनुयायी व लढावू वृत्तीचे लोक होते.

🖍  मी कासीमच्या वतीने बक्सारच्या लढाईत जवळपास 5000 सन्याशी इंग्रजांविरुध्द लढले होते.

🖍  हे लोक जमिनदारांच्या शेतीवर हल्ला करुन पिके लुटून नेणे तसेच सावकरांच्या घरांवर हल्ले करुन लुटमार करणे हे मुख्य काम करीत असे.

🖍   1763 पासून हे लोक इंग्रजांच्या ठाण्यांवर व व्यापारी केंद्रावरही हल्ले करुन पळून जात असत व सुमारे 1800 पर्यंत हा लढा चालला.

🖍   सन्याशांच्या या विध्वंसक हल्ल्यांमुळे इंग्रज अधिकारी देखील त्रस्त झाले होते.

  🖍 बकीमचंद्र चॅटर्जींच्या ‘आनंदमठ’ या कांदबरीत या लढ्याचे चित्रण पहावयास मिळते.

No comments:

Post a Comment

Latest post

combine रणनीती..

नमस्कार मित्रांनो, आज आपण शेवटच्या 90 दिवसांमध्ये संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी कशी करावी आणि 60 गुण कसे मिळवावेत याबाबत चर्चा करूयात.. ♦...