Monday 27 July 2020

भारतीय हवामान विभागाचे “मौसम” मोबाइल अॅप.

🔰भूशास्त्र मंत्रालयाच्या स्थापना दिनानिमित्त, 27 जुलै 2020 रोजी भूशास्त्र मंत्रालयाने भारतीय हवामान विभागासाठी (IMD) "मौसम" नावाच्या मोबाइल अॅपचे अनावरण केले.

🔰ICRISAT ची डिजिटल कृषी व युवा चमू, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरॉलॉजी (IITM), पुणे आणि भारतीय हवामान विभाग (IMD) यांनी संयुक्तपणे या अॅपची रचना केली आहे.

🔰तांत्रिक कार्यकुशलतेशिवाय हवामानाची माहिती आणि पूर्वानुमान एका आकर्षक पद्धतीने एकत्रित करण्यासाठी तयार केलेले हे मोबाइल अॅप सर्वसामान्यांना हाताळण्यास सोपे आहे. वापरकर्ते हवामान, हवामान अंदाज, रडार प्रतिमा यांचा वापर करू शकतात आणि त्यांना हवामानाच्या घडामोडींसंदर्भात सतर्कतेचा इशारा मिळू शकतो.

🔴मौसम मोबाइल अॅपवर खालील 5 सेवा उपलब्ध आहेतः

🔰वर्तमान हवामान - 200 शहरांसाठी दिवसातून 8 वेळा वर्तमान तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग आणि दिशा याबद्दलची सुधारित माहिती देण्यात आली आहे. सूर्योदय / सूर्यास्त आणि चंद्रोदय / चंद्रास्त याविषयीची माहिती देखील दिली आहे.

🔰नाऊकास्ट - IMDच्या राज्य हवामान केंद्राद्वारे सुमारे 800 स्थानके आणि भारतातल्या जिल्ह्यांसाठी स्थानिक हवामानातल्या घटनेविषयी आणि त्यांच्या तीव्रतेबद्दल दर तीन तासांनी इशारा देणे. तीव्र हवामानाच्या बाबतीत, त्याचा परिणाम देखील इशारामध्ये समाविष्ट केला आहे.

🔰शहरासाठीचा अंदाज - भारतातल्या सुमारे 450 शहरांमध्ये गेल्या 24 तास आणि 7 दिवसांचा हवामानाचा अंदाज उपलब्ध आहे.

🔰इशारा - नागरिकांना धोकादायक हवामानाबद्दल इशारा देण्यासाठी येत्या पाच दिवसांसाठी सर्व जिल्ह्यांना दिवसातून दोनदा कलर कोडमध्ये (लाल-गंभीर परिस्थिती, नारिंगी- सावधगिरी व पिवळा- सूचना) इशारा दिला जाऊ शकतो.रडार उत्पादने - दर 10 मिनिटांनी नवीनतम स्टेशनद्वारे रडार माहिती अद्ययावत केली जाते.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...