ASEAN-भारत देशांच्या अर्थ मंत्र्यांची 17 वी बैठक संपन्न.


🔰ASEAN समूह आणि भारत या देशांच्या अर्थ मंत्र्यांची 17 वी सल्ला-मसलत बैठक आभासी पद्धतीने 29 ऑगस्ट 2020 रोजी घेण्यात आली.

🔰बठकीला ASEAN समूहाच्या सर्व 10 देशांचे प्रतिनिधी आणि भारताच्यावतीने केंद्रीय वाणिज्य व उद्योग तसेच रेल्वे मंत्री पीयूष गोयल उपस्थित होते. पीयूष गोयल आणि व्हिएतनामचे उद्योग मंत्री त्रान तुआन अन्ह यांनी बैठकीचे अध्यक्षपद संयुक्तपणे भूषवले.

🔴चर्चेतल्या ठळक बाबी..

🔰बठकीत कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर जागतिक व्यापार संघटनेच्या नियमांचे अनुपालन करून जीवनावश्यक वस्तू आणि औषधांचा अखंडित पुरवठा करण्याचे निश्चित करण्यात आले. तसेच ASEAN क्षेत्रामध्ये आर्थिक स्थिरता आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे या बैठकीत ठरविण्यात आले.

🔰बठकीत ‘ASEAN-इंडिया ट्रेड गुडस अॅग्रीमेंट (AITIGA) याचा आढावा घेण्यात आला. ASEAN देशांमध्ये व्यापार वृद्धी होत आहे.

🔰ASEAN-इंडिया बिझिनेस कौन्सिलचा अहवाल मंत्र्यांसमोर मांडण्यात आला. अहवालात व्यापार वाढीसाठी आणि आर्थिकदृष्ट्या परस्परांना लाभदायक ठरणार अशा शिफारसी करण्यात आल्या आहेत. सुव्यवस्थित व्यापार पद्धतीच्या नियामक प्रक्रियेचे पुनरावलोकन करून करारांमध्ये सुधारणा करण्याविषयी चर्चा करण्यात आली.

🔴आग्नेय आशियाई राष्ट्र संघ (ASEAN) विषयी...

🔰आग्नेय आशियाई राष्ट्र संघ (Association of Southeast Asian Nations -ASEAN) ही आग्नेय आशियामधली एक राजकीय व आर्थिक संघटना आहे. त्याची स्थापना इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपाईन्स, सिंगापूर व थायलँड या देशांनी 8 ऑगस्ट 1967 रोजी केली. जकार्ता (इंडोनेशिया) शहरात त्याचे मुख्यालय आहे. आज समूहात ब्रुनेई, कंबोडिया, इंडोनेशिया, लाओस, मलेशिया, म्यानमार, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलँड आणि व्हिएतनाम या 10 देशांचा समावेश आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

सामान्य ज्ञान

1. काही स्थायुंना उष्णता दिल्यस त्यांचे द्रवरूपात रूपांतर न होता एकदम वायुरूपात रूपांतर होते. यांस ………. असे म्हणतात. Ans:- संप्लवन 2. निसर्ग...