Friday 11 September 2020

फाइव्ह जी तंत्रज्ञान विकासात भारत-अमेरिका-इस्रायल सहकार्य.



🔰मोबाइलच्या ‘फाइव्ह जी’ तंत्रज्ञानाची यंत्रणा उभारण्यात हुआवे या चीनच्या कंपनीला अमेरिका व भारतासह अनेक देशांनी वगळले असतानाच आता ही यंत्रणा उभारण्यासाठी भारत, इस्रायल व अमेरिका हे सहकार्य करणार आहेत.

🔰खली, विश्वासार्ह, सुरक्षित फाइव्ह जी संदेशवहन यंत्रणा उभारण्यास प्राधान्य दिले जाईल, असे अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. फाइव्ह जी तंत्रज्ञानात या तीन देशांनी पुढाकार घेतला असून अमेरिकेतील भारतीय लोक व इस्रायल यांच्यातील संपर्कातून हा प्रस्ताव पुढे आला आहे. या तीन देशांनी सहकार्य करावे, असे जुलै २०१७ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलमधील भेटीत सूचित केले होते.

🔰यएस एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंट या संस्थेच्या उपप्रशासक बोनी ग्लिक यांनी सांगितले की, हे सहकार्य म्हणजे हिमनगाचे टोक आहे. अनेक क्षेत्रात आम्ही सहकार्य करणार आहोत.

🔰भारत-अमेरिका-इस्रायल यांच्या आभासी शिखर बैठकीत त्यांनी सांगितले की, जगातील विकासाची आव्हाने हे तीन देश एकत्र येऊन पेलू शकतात. इस्रायलचे भारतातील राजदूत रॉन माल्का व त्यांचे इस्रायलमधील समपदस्थ संजीव सिंगला यांची भाषणे झाली.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...