Sunday 20 September 2020

ग्रँडस्लॅम क्षितिजावर आज नव्या ताऱ्याचा उदय.

🌞तीन वेळा अंतिम फेरीत पोहोचूनही ग्रँडस्लॅम उंचावण्याचे स्वप्न अधुरे राहिलेला डॉमिनिक थिम आणि पहिल्यांदाच ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा अलेक्झांडर झ्वेरेव्ह या नव्या ताऱ्यांना आता ग्रँडस्लॅम उंचावण्याची संधी रविवारी मिळणार आहे.


🌞करोनामुळे अमेरिकेत प्रवास करण्यास नकार देणारा राफेल नदाल आणि दुखापतीमुळे वर्षभर टेनिसपासून दूर राहणारा रॉजर फेडरर यांच्या अनुपस्थितीत नोव्हाक जोकोव्हिच अमेरिकन खुल्या ग्रँडस्लॅम जेतेपदासाठी प्रबळ दावेदार समजला जात होता. पण जोकोव्हिचची अनपेक्षित हकालपट्टी झाल्यामुळे सहा वर्षांनंतर अमेरिकन स्पर्धेला नवा विजेता मिळणार आहे.


🌞जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या ऑस्ट्रियाच्या थिमने चौथ्यांदा ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली असली तरी त्याच्यासमोर यंदा फेडरर, नदाल, जोकोव्हिच या टेनिसमधील मातब्बर त्रिकू टाचे आव्हान नसेल. त्यामुळे कारकीर्दीतील पहिल्यावहिल्या ग्रँडस्लॅम जेतेपदाला गवसणी घालण्याची संधी त्याच्यासमोर असेल.


🌞झवेरेव्हने यावर्षी ऑस्ट्रेलियन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती. आता अमेरिकन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारून त्याने आपली कामगिरी उंचावली आहे. शुक्रवारी थिमने उपांत्य फेरीत रशियाच्या डॅनिल मेदवेदेवचा ६-२, ७-६ (९-७), ७-६ (७-५) असा पाडाव केला होता. दोन सेटने पिछाडीवर पडल्यानंतरही झ्वेरेव्हने स्पेनच्या पाबलो बस्टाला ३-६, २-६, ६-३, ६-४, ६-३ अशी धूळ चारली.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...