Tuesday 29 September 2020

तीन संस्थांना IRDAIचा “डोमेस्टिक सिस्टीमॅटिकली इम्पॉर्टंट इन्शुरर्स (D-SII)” दर्जा



- भारतीय विमा विनियामक व विकास प्राधिकरणाने (IRDAI) 2020-21 या आर्थिक वर्षासाठी आणखी तीन संस्थांची “डोमेस्टिक सिस्टीमॅटिकली इम्पॉर्टंट इन्शुरर्स (D-SII)” म्हणून ओळख पटविली आहे. त्या पुढीलप्रमाणे आहेत -


१)भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC)


२)न्यू इंडिया अ‍श्युरन्स कंपनी लिमिटेड


३)भारतीय सामान्य विमा महामंडळ (GIC)


◾️महत्वाच्या बाबी


- निवडलेल्या विमा कंपन्यांना त्यांच्या कॉर्पोरेट प्रशासनाची पातळी वाढवण्याचे निर्देश दिले गेले आहेत.


- D-SII संस्था IRDAIच्या वर्धित विनियामक देखरेखीखाली असणार आहेत.


- “डोमेस्टिक सिस्टीमॅटिकली इम्पॉर्टंट इन्शुरर्स (D-SII)” विषयी


- D-SII संस्था ही अशी विमाप्रदाता संस्था मानली जाते जी अपयशी ठरणे म्हणजे ‘खूप मोठे नुकसान होणे’ असा अर्थ होतो. म्हणजेच त्या सर्वात मोठ्या आणि अतिशय महत्वाच्या असतात.


- संकटाच्या वेळी अश्या संस्थांना सरकारचे पाठबळ मिळावे या दृष्टीने ही योजना आहे.


- यापूर्वी D-SII संस्था म्हणून घोषित करण्यात आलेले - भारतीय स्टेट बँक, ICICI बँक आणि HDFC बँक.

No comments:

Post a Comment

Latest post

काकोरी कट घटना

( काकोरी ट्रेन लुट म्हणूनही ओळखली जाते) ही ब्रिटिश वसाहतवादी शासनाविरुद्धच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वपूर्ण घटना होती.  - दिना...