Saturday 24 October 2020

गांधीजींचे पदार्पण



·         स्वातंत्र्यचळवळीचा तिसरा आणि शेवटचा टप्पा 1919 मध्ये सुरु झाला. त्यावेळी प्रथमच जनआंदोलनांनी सुरवात झाली.


·         पहिल्या महायुध्दकाळात ब्रिटन, फ्रान्स व अमेरिका हया दोस्त राष्ट्रांनी जाहीर केले होते की, जागतिक महायुध्द हे लोकशाहीच्या रक्षणासाठी आणि सर्व राष्ट्रांचा स्वयंनिर्णयाचा हक्क प्रस्थापित करण्यासाठीच लढले जात आहे.


·         पण युध्दात विजी झाल्यानंतर वसाहतवादी साम्राज्यसत्ता नाहीशी करण्यास ते फारसे उत्सुक दिसेनात. भारतीयांनी युध्दप्रयत्नात सर्व सहकार्य दिले होते एवढेच नव्हे तर युध्दाची झळ मोठया प्रमाणात सोसली होती. त्याचे योग्य चीज होईल, अशी त्यांना आशा होती.


·         पण त्याचा लवकरच भाषांतरांवरूनरमनिरास झाला.


·         ब्रिटिशांनी घटनात्मक सुधारणांचे थातुरमातुर प्रयत्न केले असले तरी खरी राजकीय सत्ता सोडण्याची त्यांची बिलकूल तयारी नव्हती आणि आता एक नवे नेते श्री. मोहनदास करमचंद गांधी यांनी लढयाची सूत्रे आपल्या हाती घेतली.


·         पूर्वीच्या नेतृत्वातील मूलभूत उणिवा हेरुन त्या दूर करण्याचे त्यांचे प्रयत्न होते. त्यांनी लढयाची एक नवीनच पध्दत रुढ केली, ती म्हणजे असहकार.


·         तसेच लढयाचे एक नवे तंत्र सत्याग्रह त्यांनी अंमलात आणले. त्यामुळे लढा हा केवळ एक कार्या न राहता तो प्रत्यक्ष अंमलात आणता येऊ लागला.


·         या नव्या तंत्रांची गांधीजींनी दक्षिण आफ़्रिकेत यशस्वीरित्या चाचणी केली होती.


·         गांधीजींनी चंपारण चे शेतकीर व अहमदाबाद चे कामगार हयांचे प्रश्नही हाती घेतले होते.


·         या काळात देशाच्या वेगवेगळया भागांत महागाई एकदम वाढली आणि साथीचे रोग पसरले.


·         जागतिक युध्द संपताच गांधीजींनी भारतीय जनतेच्या मनातील वाढत्या प्रक्षोभाला व लढाऊ प्रवृत्तीला प्रतिसाद देताना एका नव्या संघटनेची व तंत्राची निर्मिती केली. त्यामुळे त्या आंदोलनास जनतेच्या पाठिंब्याचा भक्कम आधार निर्माण झाला.


▪️ मार्च 1919 मध्ये रौलट कायदा संमत करण्यात आला त्याद्वारा खटला न भरता कोणालाही तुंरुंगात डांबण्याचे अधिकार सरकारला मिळाले, त्यामुळे भारतीय जनतेचा मोठा अपमान झाला.


▪️ फब्रुवारी 1919 मध्ये गांधीजींनी सत्याग्रह सभा सुरु केली.


·         हा कायदा मोडावयाचा व स्वत:ला अटक करवून घ्यायची अशी या सभेच्या सदस्यांची प्रतिज्ञा होती.


·         अशा रीतीने राष्ट्रीय चळवळ म्हणजे केवळ एक आंदोलन न ठेवता जनतेच्या शक्तीचे प्रत्यक्ष राजकीय कृतींत रुपांतर करण्याच्या दृष्टीने गांधीजींनी पहिले पाऊल उचलले.


·         त्याचबरोबर आता शेतकरी व कारागीरांवर अधिक विसंबून राहावयास हवे असा काँग्रेसने आग्रह धरला .


·         खादी म्हणजेच हाताने कातलेल्या सुताचे हातमागावर विणलेले कापड वापरण्यावर भर हे त्याचेच एक प्रतिक होते.


·         त्याच वेळी अमृतसरला कुप्रसिध्द जलियाॅंवाला बाग हत्याकांड घडले.


▪️  13 एप्रिल 1919 रोजी चहूबाजूंनी बंदिस्त असलेल्या या बागेत शांततापूर्ण जमावाला ब्रिटिश लष्कराच्या एका तुकडीने घेतले व बंदुका आणि मशिनगन्सच्या सहाय्याने अमानुष गोळीबार केला.


·         त्याच वेळी युध्दानंतर तुर्कस्तानला औदार्याचे वागणूक देण्याचे आश्र्वासन ब्रिटिशांनी मोडले तुर्कस्तानच्या सुलतानाला खलिफा म्हणजे मुसलमानांचा धार्मिक प्रमुख मानण्यात येत असे.


·         पण तेच धोक्यात आल्याने भारतीय मुसलमानांत तीव्र तिरस्कार निर्माण झाले

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 18 एप्रिल 2024

🔖 प्रश्न.1) मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कोणाला जाहीर झा...