Saturday 24 October 2020

भारतीय निवडणूक आयोग



✍️भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील एक स्वायत्त घटनात्मक संस्था आहे.

✍️याचे मुख्यालय नवी दिल्ली येथे स्थित आहे.


✍️भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना २५ जानेवारी १९५० रोजी करण्यात आली होती. निवडणूक आयोग राज्यघटनेच्या कलम ३२४ अंतर्गत कार्य करतो.


✍️भारतातील लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती,

उपराष्ट्रपती, राज्य विधानसभा इत्यादी

निवडणुकींसाठी निवडणूक आयोग सर्वस्वी जबाबदार आहे.


✍️निवडणूक आयोगामध्ये एक मुख्य निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रपती नेमतील इतके अन्य निवडणूक आयुक्त असतात.


✍️सामाजिक प्रतिष्ठा, कायद्याचे ज्ञान आणि समृद्ध असा प्रशासकीय अनुभव असलेल्या व्यक्‍तीची नेमणूक पंतप्रधानांच्या सल्ल्याने राष्ट्रपती मुख्य निवडणूक आयुक्त पदावर करतात.


✍️सकुमार सेन हे भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते. सध्या ओमप्रकाश रावत भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त (२२वे) आहेत.

 


No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 18 एप्रिल 2024

🔖 प्रश्न.1) मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कोणाला जाहीर झा...