स्वदेशी ‘बूस्टर’ अंतर्भूत असलेल्या ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी.🔰जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या सुपरसॉनिक ‘ब्रह्मोस’ क्षेपणास्त्राची 30 सप्टेंबर 2020 रोजी ओडिशाच्या बालासोर येथून यशस्वी चाचणी घेण्यात आली. स्वदेशी ‘बूस्टर’ आणि एअरफ्रेम सेक्शन असणारे ब्रह्मोस क्षेपणास्त्र इतर अनेक स्वदेशी उप-यंत्रणांनी युक्त आहे.


🔰बरह्मोस लँड-अटॅक क्रूझ क्षेपणास्त्राचा (LACM) कमाल वेग मॅक 2.8 होता.


🔴बरह्मोस क्षेपणास्त्र...


🔰‘ब्रह्मोस’ हे भारताचे संपूर्णताः स्वदेशी सुपरसॉनिक लक्ष्यभेदी क्षेपणास्त्र आहे.


🔰बरह्मोस जवळपास 300 किलोचे विस्फोटक आता जवळपास 300 किलोमीटर दूर वाहून नेण्यास सक्षम आहे.

ब्रह्मोसच्या नावावर सर्वाधिक गतिमान सुपरसोनिक क्षेपणास्त्राचा जागतिक विक्रम आहे. याची गती ताशी सुमारे 3400 किलोमीटरपेक्षा अधिक आहे.

ब्रह्मोस कॉरपोरेशनचे 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्र भारत आणि रशिया संबंधातून विकसित करण्यात आले आहे.


🔰 ‘ब्रह्मोस कॉरपोरेशन’ भारताची संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि रशियाची NPOमशीनोस्त्रोयेनिशिया यांचा एक संयुक्त उपक्रम (JV) आहे. ब्रह्मोस (BrahMos) हे नाव भारताची ब्रह्मपुत्र आणि रशियाची मस्कवा नदीवरून ठेवण्यात आले आहे.


🔰भारतीय सेवेत ब्रह्मोस 2006 सालापासून आहे. हे एयर लॉंच्ड क्रुज क्षेपणास्त्र (ALCM) जल-थल-वायू अश्या तीनही परिस्थितीत भारतीय सेवेत आहे.ब्रह्मोस हे पहिले भारतीय क्षेपणास्त्र आहे, ज्याचा कार्यकाळ 10 ते 15 वर्षांपर्यंत वाढविण्यात आला आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

ZP पद भरती Strategy

📌📌 Strategy📌📌                मागचे तीन दिवस आयबीपीएस(IBPS) ने पशुसंवर्धन विभागासाठी परीक्षा घेतल्या. या परीक्षांमधील मराठी आणि इंग्लिश...