Friday 2 October 2020

न्यायाधीश निवडीचा अधिकार विद्यमान अध्यक्षांनाच.


🔰अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पहिल्याच वादविवाद चर्चेत विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडेन यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले. 


🔰‘सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश निवडण्याचा मला अधिकार आहे’, असा दावा ट्रम्प यांनी केला, तर डेमोक्रॅटिक उमेदवार बायडेन यानी न्यायाधीशांची निवड निवडणुकीनंतर नवीन अध्यक्षांनी करणे अपेक्षित होते असे सांगितले. कोविड१९ साथीची हाताळणी, प्राप्तिकराचा प्रश्न या मुद्दय़ांवर दोन्ही नेत्यांत खडाजंगी झाली.


🔰ओहिओतील क्लिव्हलँड येथे वादविवाद चांगलाच रंगला. ट्रम्प यांना सर्वोच्च न्यायालयात अ‍ॅमी कॉनी बॅरेट यांची नेमणूक केल्याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी सांगितले की, आम्ही निवडणूक जिंकली आहे, मी अध्यक्ष असल्याने मला न्यायाधीश नेमणुकीचा अधिकार आहे.


🔰बायडेन यांनी ट्रम्प यांच्या मताशी असहमती दर्शवत सांगितले की, अमेरिकी लोकांना सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश निवडण्याचा अधिकार आहे. जेव्हा ते अमेरिकेतील सिनेटर्ससाठी मतदान करतात व अमेरिकी अध्यक्ष निवडतात तेव्हा त्यातून हेच स्पष्ट होते. 


🔰निवडणूक प्रक्रियेच्या मध्यावर असताना ट्रम्प यांनी न्यायाधीशांची निवड केल्याने लोकांचा तो अधिकार डावलला गेला आहे. त्यामुळे न्यायाधीश नेमणुकीला आमचा विरोध आहे. मतदानाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. हजारो लोकांचे मतदान झाले आहे. त्यामुळे पुढील अध्यक्ष निवडून येण्याची वाट बघायला हवी होती.

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...