मराठी व्याकरण झाले सोपे - स्पर्धा परीक्षा स्पेशलमराठी व्याकरण आपला मित्र होऊ शकतो का ? तुम्ही असा विचार कधी केला आहे का ? आणि समजा मराठी व्याकरणाशी आपली मैत्री झाली तर...? परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क्स मिळवण्या पासून आपणास कोणीच थांबवू नाही शकणार.


हा लेख लिहण्या मागील हेतू हाच आहे की, खरच आपली मराठी व्याकरणाशी मैत्री होऊ शकते का ? आणि मैत्री होऊ शकते तर ती आपण कशा प्रकारे करू शकतो.


स्मार्ट प्रकारे अभ्यास :- मराठी व्याकरणाशी मैत्री करायची असेल तर सर्वात सुरवातीस मराठी विषयाची तुलना आपल्या दैनंदिन जीवनाशी करावी लागेल. आपण जर मराठी विषयातील घटकांची सांगड आपल्या दैनंदिन जीवनातील घटकांशी घातली तर ते अभ्यासातील घटक आपल्याला पाठ करण्याची किंवा लक्षत ठेवण्याची गरज लागणार नाही. ते सर्व घटक आपल्या कायमस्वरूपी लक्षात राहतील व अभ्यास पण एकदम मजेशीर स्वरूपात होऊन जाईल. जो अभ्यास तुम्हाला कंटाळवाणा वाटतो, तोच अभ्यास तुम्ही हसत खेळत कराल. मी माझ्या शॉर्टकट मराठी व्याकरण पुस्तकात सर्व आशा सर्व गोष्टी एकदम मजेशीर स्वरूपात लिहल्या आहेत, जेणे करून तुमचे हसत खेळत मराठी व्याकरण तोंडपाठ होईल.


चला तर मग, आपण पाहू की, मराठी घटकांची सांगड दैनंदिन जीवनातील घटकांशी कशी घातली जाऊ शकते.


● वाक्य :-** अर्थ पूर्ण शब्दांच्या समूहाला वाक्य म्हणतात.

★ ट्रिक्स :- असे समजा की वाक्य म्हणजे आपले कुटुंब आहे. जसे विविध शब्द एकत्र आले की वाक्य बनते, तसेच विविध माणसे एकत्र आले की कुटुंब बनते.


मराठीत पुढीलप्रमाणे शब्दांच्या आठ जाती आहेत, त्या जातींची तुलना  आपण विविध व्यक्ती नुसार करूया -


1. नाम ( Noun ) :- प्रत्येक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणवणाऱ्या वस्तुंना किंवा त्यांच्या गुणधर्माला नाम असे म्हणतात.   

★ ट्रिक्स :- असे समजा की, नाम म्हणजे मुलगा. मुलगा जन्माला म्हणजे त्याचे काही तरी नाव ठेवावं लागते, त्यालाच नाम म्हणतात.


2. सर्वनाम ( Pronoun ) :-  नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात.  

★ ट्रिक्स :- असे समजा की, सर्वनाम म्हणजे आत्या. नामाबद्दल वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम, तसेच आत्या मुला बद्दल नाव ठेवत असते.


3. विशेषण ( Adjective ) :- नामाबद्दल विशेष माहिती सांगणार्याय शब्दास विशेषण असे म्हणतात.

★ ट्रिक्स :- असे समजा की, विशेषण म्हणजे आई. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास विशेषण म्हणतात, तसेच आई मुलाबद्दल विशेष माहिती सांगत असते. 


4. क्रियापद ( Verb ) :- वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात.

★ ट्रिक्स :- असे समजा की, क्रियापद म्हणजे मुलगी. जसे क्रियापदा शिवाय वाक्य पूर्ण होत नाही, तसेच मुली शिवाय कुटुंब पूर्ण दिसत नाही.


5. क्रियाविशेषण अव्यय ( Adverb ) :- जे शब्द क्रियापदा बद्दल विशेष माहिती सांगतात, परंतु कर्त्याच्या लिंग, वचन व पुरुषानुसार बदलत नाहीत त्यांना क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. 

★ ट्रिक्स :- असे समजा की, क्रियाविशेषण म्हणजे वडील. जसे क्रियाविशेषण क्रियापदा बद्दल विशेष माहिती सांगते, तसेच वडील ( क्रियाविशेषण ) मुली ( क्रियापद ) बद्दल विशेष माहिती सांगत असतात.  

       

6. उभयान्वयी अव्यय ( Conjunction ) :- दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्ये यांना जोडणाऱ्या शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. 

★ ट्रिक्स :- असे समजा की, उभयान्वयी अव्यय म्हणजे आजोबा. जसे उभयान्वयी अव्यय दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडण्याचे काम करते, तसेच आजोबा देखील कुटुंबातील माणसांना किंवा दोन कुटुंबांना जोडण्याचे काम करत असतात. 


7. शब्दयोगी अव्यय ( Prepositions ) :- काही शब्द नामांना किंवा सर्वनामाना जोडून येतात व त्या वाक्यातील दुस‌या एखाद्या शब्दाशी संबंध दाखवतात अशा शब्दांना शब्दयोगी अव्यय म्हणतात.   

★ ट्रिक्स :-  असे समजा की, शब्दयोगी अव्यय म्हणजे मामा. जसे शब्दयोगी अव्यय म्हणजे नामांना किंवा सर्वनामांना जडून येणारे शब्द, तसेच मामा हे देखील मुलगा ( भाचा ) व आत्या ( बायको ) यांच्याशी जुडलेला असतो. 


8. केवलप्रयोगी अव्यय ( Exclamatory Words ) :- मानवी मनातील भावना अचानक व्यक्त करण्यासाठी वापरला जाणारा शब्द  म्हणजे केवल प्रयोगी अव्यय.


★ ट्रिक्स :- असे समजा की, केवलप्रयोगी अव्यय म्हणजे मामाची मुलगी. भावना अचानक व्यक्त करण्यासाठी वापरला जाणारा शब्द  म्हणजे केवल प्रयोगी अव्यय, अशाच प्रकारे मामाच्या मुलीला पाहताच भावना अचानक  व्यक्त होतात. 

" वाह....! किती छान ही मामाची मुलगी."

No comments:

Post a Comment

Latest post

सामान्य ज्ञान

1. काही स्थायुंना उष्णता दिल्यस त्यांचे द्रवरूपात रूपांतर न होता एकदम वायुरूपात रूपांतर होते. यांस ………. असे म्हणतात. Ans:- संप्लवन 2. निसर्ग...