Friday 2 October 2020

महाराष्ट्रात सुटी सिगारेट किंवा बिडी विकायला बंदी



महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाने एक आदेश काढत राज्यात कुठेही सुटी सिगारेट किंवा बिडी विकायला बंदी घातली आहे.

‘सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादन अधिनियम-2003’ ( जाहिरात, प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा आणि वितरण विनियमन) याच्यानुसार सिगारेटच्या पाकिटाच्या 85 टक्के भागावर सिगारेट वा बिडी आरोग्याला घातक असल्याचा संदेश असावे बंधनकारक करण्यात आले होते. त्यामुळे सिगारेट हे आरोग्याला धोक्याचे असल्याचा संदेश दिला गेला.

 परंतु, सिगारेटच्या पाकिटातून सिगारेटची आणि बिडीची एकेक विक्री केली जात आहे आणि त्यामुळे आरोग्याचा संदेश पोहचविण्याला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे निर्णय घेण्यात आला.

पाकिट अथवा बिडी बंडलाची विक्री केल्यास कायद्यात अपेक्षित असलेला उद्देश म्हणजे 'धोक्याची कल्पना' हा साध्य होतो. मात्र तेच सुटी सिगारेट विकल्यास ग्राहकाला धोक्याची कल्पना कायद्याच्या अर्थाप्रमाणे मिळत नाही.

कायद्याप्रमाणे, शाळा-महाविद्यालये तसेच रुग्णालये व धार्मिक स्थळांच्या शंभर मीटरच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी लागू करण्यात आली.

No comments:

Post a Comment

Latest post

प्रमुख राजवंश व त्यांचे संस्थापक सम्राट आणि अंतिम सम्राट

❑ नन्द वंश  संस्थापक ➛ महापद्‌म / उग्रसेन अंतिम शासक ➛ धनानंद ❑ मौर्य वंश  संस्थापक ➛ चंद्रगुप्त मौर्य  अंतिम शासक ➛ बृहद्रथ  ❑ गुप्त वंश  स...