Thursday 8 October 2020

अर्थव्यवस्था प्रश्न सराव


1) भारतात आर्थिक नियोजन शिस्तबद्ध पद्धतीने रुजावे यासाठी सर्वप्रथम प्रयत्नात येतात.

   अ) श्री. एम. एन. रॉय यांचे पुस्तक “प्लॅन्ड इकॉनॉमी फॉर इंडिया”

   ब) श्री. विश्वेश्वरय्या यांचे “टेन यिअर पिपल्स प्लॅन”

        वरील दोन विधानांपैकी कोणते योग्य आहे ?


   1) केवळ अ   

   2) केवळ ब 

   3) दोन्ही     

   4) एकही नाही


उत्तर :- 4


2) राज्यांचा एकत्रित निधी वाढवण्यासाठी खालीलपैकी कोणती उपाययोजना बाराव्या वित्त आयोगाने (2005-10) सुचविली आहे ?

   1) ग्रामपंचायत आणि नगरपालिकांचा वित्तीय साधनांना पूरक निधी

   2) विकेंद्रीकरणाच्या प्रक्रियेस प्रोत्साहन देणे

   3) रस्ते आणि पूल बांधणे

   4) आर्थिक विकासास चालना देणे


उत्तर :- 2


3) भारताच्या दहाव्या पंचवार्षिक योजनेनुसार (2002-2007) शेती क्षेत्रामधून अजूनही ............. टक्के रोजगार निर्मिती होत आहे.

   1) 50.3   

   2) 40.4    

   3) 45.0     

  4) 58.4


उत्तर :- 1


4) दारिद्रय निर्मुलन (गरीबी हटाओ) आणि आत्मनिर्भरता ही .............. पंचवार्षिक योजनेची प्रमुख उद्दिष्टे होती.

1) तिस-या    

2) पाचव्या   

3) दुस-या    

4) सहाव्या


उत्तर :- 2


5) उत्तरांचल, छत्तीसगड, झारखंड या राज्यांची निर्मिती ............. या पंचवार्षिक योजनेत झाली.

   1) नवव्या    

  2) सातव्या  

  3) आठव्या   

  4) वरीलपैकी नाही


उत्तर :- 1



6) योग्य जोडया जुळवा.

   अ) 1 ली योजना      i) उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरण प्रतिमान    

   ब) 2 री योजना      ii) हॅरॉड, डोमर प्रतिमान

   क) 8 वी योजना      iii) महालनोबिस प्रतिमान

   ड) 11 वी योजना    iv) पुरा प्रतिमान

  अ  ब  क  ड

         1) i  ii  iii  iv

         2) ii  iii  iv  i

         3) ii  iii  i  iv

         4) iv  i  ii  iii


उत्तर :- 3


7) खालीलपैकी कोणते घटक भारतामधील  आर्थिक नियोजनाचे अपयश आहेत ?

   अ) अल्प दरडोई उत्पन्न आणि वृद्धी दर

   ब) दारिद्रय आणि बेकारी

   क)‍ संथ औद्योगिकरण

   ड) उत्पन्न आणि संपत्तीमधील विषमता

   1) ब, ड आणि क 

   2) अ आणि ब   

   3) अ, ब आणि क  

  4) ब आणि ड


उत्तर :- 4


8) भारतीय नियोजन मंडळाने प्रादेशिक असमतोल कमी करण्यासाठी धोरणात्मक उपाय योजना स्वीकारलेल्या आहेत. त्या 

     खालीलप्रमाणे –

   अ) मागास प्रदेशाचा प्रत्यक्ष विकास करण्यासाठी विशेष क्षेत्र विकास कार्यक्रम राबविणे.

   ब) मागास प्रदेशातील उद्योग प्रकल्पांना सवलतीचा वित्तपुरवठा स्टेट बँक ऑफ इंडिया कडून देणे.

   क) मागास प्रदेशात खाजगी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे.

         वरीलपैकी कोणते/ती विधान/ ने बरोबर आहे/ आहेत  ?


   1) अ आणि क     

   2) ब आणि क   

   3) फक्त अ    

   4) अ, ब आणि क


उत्तर :- 1


9) भारतातील आठ अग्रगण्य उद्योगपतींनी 1950 च्या दशकात तयार केलेल्या आर्थिक विकासाच्या योजनेस ............ म्हणतात.

   1) बॉम्बे प्लॅन (योजना)   

   2) गांधी योजना   

   3) नेहरू योजना   

   4) पंचवार्षिक योजना


उत्तर :- 1


10) भारतातील कोणत्या राज्याने पहिल्यांदा विकेंद्रीत नियोजन अंगिकारले ?

     1) कर्नाटक  

     2) महाराष्ट्र    

     3) गुजरात  

    4) राजस्थान


उत्तर :- 4

No comments:

Post a Comment

Latest post

केंद्रीय दक्षता आयोग (Central Vigilance Commission)

🔻भारतातील एक सर्वोच्च सरकारी संस्था जी देशाच्या सार्वजनिक प्रशासनात अखंडता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्त्व वाढवण्यासाठी जबाबदार आहे. 🔻स्थ...