Saturday 14 November 2020

लोणार सरोवर आता रामसर पाणथळ क्षेत्र म्हणून ओळखले जाणार




🔸लोणार सरोवर हे आता रामसर पाणथळ क्षेत्र म्हणून ओळखले जाणार असल्याची घोषणा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली आहे. 


🔷महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यात असलेले लोणार सरोवर राज्यातील सात आश्चर्यांपैकी मानले जाते. 


🔸लोणार सरोवर नेमके वय किती, यावरून मतमतांतरे आहे. सरोवराचे वय मोजण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरल्या गेल्या आहेत. एक म्हणजे थर्मोलोमिनेसेन्स विश्लेषण पद्धत. 


🔰यानुसार, लोणार सरोवर ५२ हजार वर्षे जुना आहे. परंतु, आजच्या काळात सर्वांत अचूक मानल्या जाणाऱ्या ऑर्गन डेटिंगनुसार, लोणार सरोवराची निर्मिती ही सुमारे ५ लाख ७० हजार वर्षांपूर्वी झाली असावी, असे सांगितले जाते. २०१० मध्ये यासंदर्भातील संशोधन करण्यात आले होते.

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 18 एप्रिल 2024

🔖 प्रश्न.1) मा. दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान तर्फे दिला जाणारा दीनानाथ मंगेशकर पुरस्कार संगीत क्षेत्रातील योगदानाबद्दल कोणाला जाहीर झा...