Friday 6 November 2020

डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला विजयाचा दावा, डेमोक्रॅटिक पक्षावर केला गंभीर आरोप



🔰वॉशिंग्टन - अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा पेच दिवसागणित अधिकच वाढत आहे. एकीकडे मतमोजणीत डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार ज्यो बायडन यांनी मोठी आघाडी घेतली असली तरी डोनाल्ड ट्रम्प वारंवार आपल्या विजयाचा दावा करत आहेत. अनधिकृत मतांच्या माध्यमातून विजय चोरण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी मतमोजणी अखेरच्या टप्प्यात पोहोचली आहे. दरम्यान, सध्याच्या आकडेवारीनुसा ज्यो बायडन यांना २६४ तर डोनाल्ड ट्रम्प यांना २१४ इलेक्टोरल मते मिळाली आहेत.


🔰परसारमाध्यमांशी संवाद साधताना ट्रम्प म्हणाले की, जर तुम्ही वैध मतांची मोजणी केली तर मी सहजपणे जिंकत आहे. मात्र जर तुम्ही अवैध मतांची (मेल इन बॅलेट्स) मोजणी केली तर डेमोक्रॅट आमच्याकडून विजय हिरावून घेण्याचा प्रयत्न करू शकतात. मी अनेक मोठ्या राज्यांमध्ये ऐतिहासिक मताधिक्याने विजय मिळवला आहे.


🔰यावेळी विविध माध्यमांनी दाखवलेल्या ओपिनियन पोल्सवरही डोनाल्ड ट्रम्प यांनी शंका उपस्थित केली. ओपिनियन पोल्स घेणाऱ्यांनी जाणीवपूर्वक संपूर्ण देशाता ब्लू व्हेव दाखवली. प्रत्यक्षात अशी कुठलीही लाट नव्हती. संपूर्ण देशात मोठी रेड व्हेव आहे. याचा प्रसारमाध्यमांना अंदाज होता. मात्र त्याचा आम्हाला फायदा झाला नाही, असे ट्रम्प यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

Latest post

हिमालयातील 8000 मी.उंचीपेक्षा जास्त उंची असणारी शिखरे..

-----------------======---------------------- शिखर               उंची(मी)             स्थान ---------------------------------------------...