Friday 6 November 2020

हजिरा ते घोघा रो-पॅक्स फेरी सेवेला हिरवा झेंडा‼️‼️



🦋हजिरा ते घोघा रो-पॅक्स फेरी सेवा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गुजरातमधल्या हजिरा येथील रो-पॅक्स टर्मिनलचे 8 नोव्हेंबर 2020 रोजी उद्घाटन होणार आहे. ते हजिरा ते घोघा रो-पॅक्स फेरी सेवेला हिरवा झेंडा दाखविणार आहेत.


🅾️ठळक बाबी


🦋जलमार्ग वाहतुकीसाठी हजिरा येथे तयार करण्यात आलेल्या रो-पॅक्स टर्मिनलची लांबी 100 मीटर असून रूंदी 40 मीटर आहे. यासाठी सुमारे 25 कोटी रूपये खर्च करण्यात आला आहे.


🦋रो-पॅक्स फेरी व्हेसलचे ‘व्होएज सिम्फनी’ या नावाचे तीन डेकचे जहाज आहे. त्याची क्षमता 2500-2700 मेट्रिक टन आहे. त्याचबरोबर 12000 ते 15000 GT सामान वाहून नेण्याची क्षमता आहे. या फेरी बोटीच्या मुख्य डेकवरून 30 मालमोटारी (प्रत्येकी 50 मेट्रिक टन वजनाच्या) वाहून नेता येणार आहेत. अप्पर डेकवर 100 प्रवासी गाडया आणि सर्वात वरच्या प्रवासी डेकवर  500 प्रवासी आणि त्याव्यतिरिक्त जहाजावरील 34 कर्मचारी आणि आदरातिथ्य करणारा कर्मचारी वर्ग यांची वाहतूक होऊ शकणार आहे.

सेवेचे फायदे


🦋हजिरा ते घोघा या दरम्यान जलवाहतुकीचे अनेक लाभ होणार आहेत. दक्षिण गुजरात आणि सौराष्ट्र यांच्यामध्ये हा जलमार्ग ‘गेट वे’ म्हणून काम करणार आहे. त्यामुळे घोघा ते हजिरा यांच्यामधले 370 किलोमीटरचे अंतर कमी होऊन ते अवघे 90 किलोमीटर होणार आहे. त्याचबरोबर सामानाच्या वाहतुकीचा वेळ 10 ते 12 तासांवरून फक्त चार तास होणार आहे.


🦋परिणामी, अंदाजे प्रतिदिनी 9000 लिटर इंधनाची बचत होऊ शकणार आहे. या जलमार्गामुळे वाहतुकीच्या कोंडीचा त्रास कमी होणार. त्याचबरोबर वाहनांची वाहतूक कमी झाली तर कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमालीचे कमी होणार आहे. प्रतिदिनी अंदाजे 24 मेट्रिक टन म्हणजेच प्रतिवर्षाला 8,653 मेट्रिक टन कार्बन उत्सर्जनामध्ये घट होऊ शकणार आहे.


🦋फरी सेवेमुळे सौराष्ट्र आणि कच्छ भागामधील बंदरांच्या क्षेत्रात फर्निचर आणि खते उद्योगाला चालना मिळणार आहे. गुजरातमध्ये विशेषतः पोरबंदर, सोमनाथ, व्दारका आणि पालिताना येथे पर्यटनाला प्रोत्साहन मिळू शकणार आहे. फेरी सेवेमुळे गिर येथील वन्यजीव अभयारण्याचा मार्ग सुलभ होणार आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

काकोरी कट घटना

( काकोरी ट्रेन लुट म्हणूनही ओळखली जाते) ही ब्रिटिश वसाहतवादी शासनाविरुद्धच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वपूर्ण घटना होती.  - दिना...