Wednesday 4 November 2020

भारतीय संघाच्या क्रिकेट साहित्याचा करार तोटय़ाचा.


🔰एमपीएल स्पोर्ट्स अ‍ॅपॅरल आणि अ‍ॅक्सेसरीज हे पुढील तीन वर्षांसाठी भारतीय क्रिकेट संघाच्या क्रिकेट साहित्याचे नवे पुरस्कर्ते निश्चित झाले आहेत. परंतु ‘बीसीसीआय’ला प्रति सामन्यांसाठी नायकेच्या ८८ लाख रुपयांच्या तुलनेत एमपीएलकडून फक्त ६५ लाख रुपये मिळणार आहेत. म्हणजे ‘बीसीसीआय’ प्रति सामन्यास २३ लाखांचा तोटा सहन करावा लागणार आहे.


🔰भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या कार्यकारिणी सदस्याने सोमवारी एमपीएल कंपनीशी करार झाल्याची माहिती दिली. ‘बीसीसीआय’च्या क्रिकेट साहित्याचा करार भारताच्या पुरुष, महिला, ‘अ’ संघ आणि युवा (१९ वर्षांखालील) संघांसाठी करण्यात आला आहे. ‘बीसीसीआय’ला विक्रीसंदर्भातील स्वामित्व हक्कापोटी आणखी १० टक्के रक्कमसुद्धा मिळू शकेल. हा करार नोव्हेंबर २०२३ पर्यंत कार्यरत असेल.


🔰एमपीएल हे सध्या ‘आयपीएल’मधील कोलकाता नाइट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरु या संघांशी करारबद्ध आहेत. याचप्रमाणे कॅरेबियन प्रीमियर लीगमधील ट्रिनबागो नाइट रायडर्स, आर्यलड आणि संयुक्त अरब अमिरातीशी करारबद्ध आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 23 एप्रिल 2024

◆ युनायटेड स्टेट्स 2023 मध्ये सर्वाधिक लष्करी खर्च करणारा देश बनला आहे. ◆ केरळमध्ये सर्वात मोठा मंदिर उत्सव ‘थ्रिसूर पूरम 2024’ साजरा करण्...