Thursday 31 December 2020

आतरराष्ट्रीय विमानांवर आता 31 जानेवारीपर्यंत बंदी

 

♒️आतरराष्ट्रीय विमानांवर आता 31 जानेवारीपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. मोदी सरकारने हा तातडीचा निर्णय घेतला आहे.


♒️करोनाच्या पार्श्वभूमीवर आणि ब्रिटनमध्ये आढळलेल्या करोनाच्या नव्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे.


♒️तर आधी ही बंदी 31 डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत होती. त्यानंतर ती 7 जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली. मात्र आता 31 जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय विमानांवर बंदी घालण्यात आली आहे.


♒️विशेष विमानं आणि माल वाहतूक विमानांना  यातून वगळण्यात आलं आहे असंही केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫

❇️ युनायटेड नेशन्स ट्रेड अँड डेव्हलपमेंट (UNCTAD ) च्या अहवालानुसार  2023 मध्ये भारतात थेट परकीय गुंतवणुकीत 15 व्या स्थानावर आहे ◾️2023 मध...