Thursday 17 December 2020

पाकिस्तानात कठोर कायद्याला मंजुर.


🔰पाकिस्तानमध्ये बलात्काराविरोधात कठोर कायदा  करण्यात आला आहे. बलात्कार प्रकरणाची लवकरात लवकर सुनावणी करणं तसचं कठोर शिक्षा देण्याची या कायद्यात तरतूद आहे.तर इतकंच नाही तर तर दोषी आढळलेल्या व्यक्तीला नपुंसक करण्याचाही उल्लेख या कायद्यात आहे.

 

🔰पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी या नव्या कायद्यावर स्वाक्षरी करण्यात आली आहे.

नव्या कायद्यामध्ये बलात्कारासारख्या गंभीर प्रकरणात सहभागी असणाऱ्यांचं नॅशनल रजिस्टर तयार केलं जाणार आहे. यासोबतच पीडितेची ओळख गुप्त ठेवण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.


🔰राष्ट्रपती भवनाकडून निवेदन प्रसिद्ध करण्यात आलेलं असून या नव्या अध्यादेशांतर्गत बलात्कार प्रकरणांची लवकर सुनावणी व्हावी यासाठी देशभरात विशेष न्यायालयं उभारली जाणार  आहेत. चार महिन्याच्या आत प्रकरणाचा निकाल लावला जाईल.

No comments:

Post a Comment

Latest post

𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫

❇️ युनायटेड नेशन्स ट्रेड अँड डेव्हलपमेंट (UNCTAD ) च्या अहवालानुसार  2023 मध्ये भारतात थेट परकीय गुंतवणुकीत 15 व्या स्थानावर आहे ◾️2023 मध...