Friday 25 December 2020

चार राज्यांत पुढील आठवडय़ात करोना लसीकरण सराव फेऱ्या


🔶कोविड-19 लसीकरण मोहिमेसाठी जी यंत्रणा उभारण्यात आली आहे त्याच्या सुसज्जतेचे मूल्यांकन करण्यासाठी केंद्र सरकारने 28 आणि 29 डिसेंबर रोजी पंजाब, आसाम, आंध्र प्रदेश आणि गुजरातमध्ये सराव फेऱ्यांचे आयोजन केले आहे.


🔶तसेच लशीच्या वितरणावर देखरेख ठेवण्यासाठीचा ऑनलाइन मंच को-विनमध्ये आवश्यक ती नोंदणी करणे, चाचणीपत्र आणि त्याचे वितरण, पथकातील सदस्य तैनात करणे, सायंकाळच्या बैठका आणि अहवाल यांचा सराव फेऱ्यांमध्ये अंतर्भाव करण्यात येणार आहे.त्याचप्रमाणे कोविड-19 लशी ठेवण्यासाठी करण्यात आलेल्या शीतकरण व्यवस्थेची चाचणी, चाचणीसाठी येणाऱ्या गर्दीचे शारीरिक अंतर ठेवून व्यवस्थापन करणे यांचाही सराव फेऱ्यांमध्ये समावेश करण्यात येणार आहे, असेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.


🔶तर प्रत्येक राज्याने दोन जिल्ह्य़ांत अशा फेऱ्या आयोजित करावयाच्या आहेत. जिल्हा रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण भाग येथे मुख्यत्वे फेऱ्यांचे आयोजन अपेक्षित आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

वाचा :- इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये

◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले ◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन ◾️...