Tuesday 12 January 2021

भारतीय महिला वैमानिकांचा विक्रम.


🔶सर्व महिला वैमानिकांनी सारथ्य केलेले एअर इंडियाचे सॅन फ्रान्सिस्को- बंगळूरु हे विमान सोमवारी बंगळूरुला येऊन पोहचले आणि भारतीय विमानाने विना थांबा सर्वाधिक अंतर पार करण्याच्या या विक्रमाची देशाच्या हवाई वाहतुकीच्या इतिहासात नोंद झाली.


🔶सथानिक वेळेनुसार शनिवारी रात्री साडेआठ वाजता सॅन फ्रान्सिस्कोहून निघालेले एआय-१७६ हे विमान सोमवारी पहाटे ३.४५ वाजता बंगळूरुच्या केंपेगौडा विमानतळावर उतरल्यानंतर त्यातील कर्मचारी विमानतळाच्या लाऊंजकडे आले, तेव्हा मोठय़ा संख्येत जमलेल्या लोकांनी आनंदाने घोषणा देत त्यांचे स्वागत केले. सर्व महिला वैमानिकांचा समावेश असलेल्या या चमूने उत्तर ध्रुवावरून सर्वाधिक अंतराचे उड्डाण करण्याचा विक्रम केला आहे.


🔶एअर इंडिया किंवा इतर कुठल्या भारतीय विमान कंपनीतर्फे संचालित हे सर्वात लांब अंतराचे व्यावसायिक विमान उड्डाण असेल, असे एअर इंडियाने यापूर्वी सांगितले होते. जगाच्या दोन विरुद्ध टोकांवर असलेल्या या दोन शहरांतील थेट अंतर १३,९९३ किलोमीटर असून, त्यात सुमारे १३.५ तासांचा ‘टाइम झोन’ बदल होतो.


🔶लोकांने हर्षोल्लास व्यक्त करत टाळ्या वाजवत असताना कॅप्टन झोया अगरवाल, कॅ. पापागरी तन्मयी, कॅ. आकांक्षा सोनावणे व कॅ. शिवानी मन्हास यांनी हाताचे अंगठे उंचावून त्यांना प्रतिसाद दिला.  ‘भारतीय हवाई वाहतुकीतील महिला वैमानिकांनी इतिहास निर्माण केला असून हा मनात जतन करण्याचा आणि साजरा करण्याचा क्षण आहे. या चारही वैमानिकांचे हार्दिक अभिनंदन!’, असे ट्वीट केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी केले.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...