Tuesday 19 January 2021

पंतप्रधान मोदी यांना जी ७ परिषदेसाठी निमंत्रण.


🔰या वर्षांच्या मध्यात ब्रिटनच्या किनारी भागातील कॉर्नवॉल येथे होणाऱ्या जी ७ राष्ट्रांच्या परिषदेसाठी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी त्यांचे भारतीय समपदस्थ नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिले आहे. ही उच्चस्तरीय परिषद ११ ते १३ जून या कालावधीत ब्रिटनच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.


🔰या बहुपक्षीय परिषदेतील पाहुणे देश म्हणून गेल्या वर्षी दक्षिण कोरिया व ऑस्ट्रेलिया यांच्यासोबतच भारताची निवड करण्यात आली, त्या वेळी जॉन्सन यांनी मोदी यांना दूरध्वनीवरून परिषदेत सहभागाचे निमंत्रण दिले होते. त्याची औपचारिक घोषणा रविवारी करण्यात आली.


🔰या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभात जॉन्सन हे प्रमुख पाहुणे होते, मात्र करोनाच्या संकटामुळे त्यांची ही भेट रद्द करण्यात आली. त्यानंतर जी ७ परिषदेपूर्वी भारताला भेट देण्याचा मनोदय जॉन्सन यांनी व्यक्त केला. ‘ग्रुप ऑफ सेव्हन’ किंवा जी ७ राष्ट्रांच्या गटात ब्रिटन, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान व अमेरिका यांचा समावेश आहे. जगातील सर्वाधिक प्रभावशाली व खुल्या समाजांना घनिष्ट चर्चेसाठी एकत्र आणणारे खुले व्यासपीठ असे त्याचे वर्णन करण्यात येते. या वर्षीच्या चर्चेत करोनाच्या महासाथीचा विषय प्रामुख्याने असण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...