Friday 29 January 2021

भारतात ‘टिकटॉक’चा व्यवसाय बंद.


🔰चीनची बाईट डान्स ही कंपनी भारतातील टिकटॉक व हेलो उपयोजनांचा व्यवसाय बंद करणार असल्याचे सांगण्यात आले. बाईट डान्स या समाज माध्यम कंपनीच्या मालकीचे टिकटॉक हे उपयोजन असून त्यावर भारताने बंदी घातली होती, तसेच सरकारने टिकटॉक व हेलो सह ५९ उपयोजनांवर जूनमध्ये बंदी घातली होती.


🔰टिकटॉकच्या जागतिक हंगामी प्रमुख व्हॅनेसा पप्पास व जागतिक व्यवसाय प्रमुख ब्लेक चँडली यांनी संयुक्त ईमेलमध्ये ही माहिती दिली असून टिकटॉक भारतात बंद करून कमर्चारीही कमी करण्यात येतील असे म्हटले आहे. भारतात पुनरागमन केव्हा होईल हे सांगता येणार नाही, पण आम्ही नक्कीच पुन्हा भरारी घेऊन भारतात परत येऊ, असे त्यांनी म्हटले आहे.


🔰टिकटॉकच्या प्रवक्त्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की कंपनीने भारतात २९ जून २०२० रोजी लागू करण्यात आलेले नियम पाळण्याचे वचन दिले होते तरी उपयोजनावर बंदी घालण्यात आली. स्थानिक कायदे व नियमांचे आम्ही पालन केले होते, त्यामुळे गेल्या सहा महिन्यात आम्हाला कुठलेही स्पष्ट निर्देश सरकारकडून मिळाले नव्हते.

No comments:

Post a Comment

Latest post

महत्वपूर्ण ऐतिहासिक घटना (1939-1947)

🟢 1939 📌 लिनलिथगो विधान (1939)   ✦ ब्रिटन फक्त युद्धात आक्रमकतेचा प्रतिकार करत आहे   ✦ 1935 च्या कायद्यात सर्वसहमतीनंतर बदल केले जातील   ✦...