१६ जानेवारी २०२१

आत्मनिर्भर भारत! ‘स्वदेशी शस्त्रांनी भविष्यातील युद्ध जिंकण्याचं लक्ष्य’.



🔰भविष्यातील कुठलेही युद्ध स्वदेशी बनावटीच्या शस्त्रास्त्रांनी जिंकण्याच्या टप्प्प्यापर्यंत पोहोचण्याचे भारताचे लक्ष्य आहे असे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत यांनी गुरुवारी सांगितले.


🔰इडियन एअर फोर्ससाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडकडून ८३ मार्क-१ ए तेजस फायटर विमाने विकत घेण्याच्या व्यवहाराला मंत्रिमंडळ समितीने काल मंजुरी दिली. हा सर्व व्यवहार ४८ हजार कोटी रुपयांचा आहे.


🔰हा निर्णय केंद्र सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाला बळकटी देणारा आहे. त्यानंतर आज बिपिन रावत यांनी हे विधान केले. “स्वदेशीकरण आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेला पाठिंबा देण्यावर आमचा भर असेल” असे रावत यांनी सांगितले. “मेड इन इंडिया इंजिनसह विमानातील सर्व महत्त्वाचे भाग स्वदेशी असतील आणि अशा विमानाने आमची एअर फोर्स गगनाला स्पर्श करताना आम्हाला पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे” असे बिपिन रावत म्हणाले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

१० चालू घडामोडी २६ एप्रिल २०२५

१. भारत सरकारने अलीकडेच किती नवीन आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मान्यता दिली आहे? अ. ३००० बी.५००० सी.७००० डी.१०,००० उत्तर: डी. १०,००० स्...