Sunday 7 February 2021

Amazon चे फाउंडर जेफ बेझोस यांची मोठी घोषणा, CEO पदावरुन होणार पायउतार



जगातील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी अ‍ॅमेझॉनचे फाउंडर जेफ बेझोस यांनी कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदावरुन पायउतार होणार असल्याची घोषणा केली आहे. वर्षाच्या अखेरपर्यंत बेझोस कंपनीच्या सीईओ पदावरुन पायउतार होतील. त्यांच्या जागी अ‍ॅमेझॉन वेब सर्व्हिसचे प्रमुख अँडी जेसी यांच्याकडे सीईओची जबाबदारी येईल.


अ‍ॅमेझॉनमधील भागीदारीच्या जोरावर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या बेझोस यांनी तिसऱ्या तिमाहीमध्ये सीईओ पदाचा राजीनामा देणार असल्याचं सांगितलं. बेझोस यांनी अ‍ॅमेझॉनच्या कर्मचाऱ्यांना एक लेटर पाठवून याद्वारे माहिती दिली. 


अ‍ॅमेझॉनमध्ये आता नवीन प्रोडक्ट्सवर जास्त लक्ष देणार असल्याचं त्यांनी म्हटलंय. सीईओ पद सोडल्यानंतर त्यांच्याकडे स्पेस एक्सप्लोरेशन कंपनी ब्लू ओरिजिनसोबतच अन्य प्रोजेक्ट्सवर लक्ष देण्यासाठी जास्त वेळ मिळेल.


दरम्यान, सीईओ पद सोडल्यानंतरही बेझोस हेच कंपनीचे सर्वात मोठे शेअरहोल्डर असतील आणि कंपनीत त्यांचा दबदबा कायम असेल असं समजतंय.


 57 वर्षांच्या बेझोस यांनी 1994 मध्ये अ‍ॅमेझॉनची स्थापना केली होती. तर, बेझोस यांच्याजागी सीईओ बनणारे अँडी जेसी यांनी 1997 मध्ये मार्केटिंग मॅनेजर म्हणून अ‍ॅमेझॉनमध्ये कामाला सुरूवात केली होती. "अँडीला कंपनीत सर्वजण ओळखतात, ते दीर्घकाळापासून कंपनीसोबत काम करत आहे. मला खात्री आहे की ते उत्तम लीडर ठरतील", असं बेझोस म्हणाले.

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...