Saturday 27 March 2021

दुहेरी उत्परिवर्तनांच्या करोना विषाणूंचा भारतात आढळ


🔰दोन उत्परिवर्तने असलेला सार्स सीओव्ही २ विषाणू (करोना) भारतातील काही नमुन्यात आढळून आला असून इतर अनेक गंभीर स्वरूपाचे विषाणूही १८ राज्यांत सापडल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. या प्रकारांपैकी काही विषाणू प्रकार या आधी परदेशात सापडले होते.


🔰भारतातील सार्स सीओव्ही २ कन्सॉर्टियम ऑन जिनॉमिक्स (इन्साकॉग) या संस्थेने देशाच्या विविध राज्यांतील विषाणू नमुन्यांच्या जनुकीय क्रमवारीचे काम केले असून त्यात दोन उत्परिवर्तने असलेले काही विषाणू असल्याचे निष्पन्न झाले आहे. सध्याच्या परिस्थितीचे निरीक्षण जनुकीय क्रमवारी व साथरोगशास्त्रीय आधारावर केले जात आहे. आरोग्य मंत्रालयाने २५ डिसेंबर रोजी ‘इन्साकॉग’ ही संस्था परदेशातून येत असलेल्या विषाणूंवर तसेच येथील देशी विषाणूतील बदलांवर लक्ष ठेवण्यासाठी स्थापन केली होती. यात दहा राष्ट्रीय प्रयोगशाळांचा समावेश असून विषाणूंच्या नमुन्यांची जनुकीय क्रमवारी अभ्यासण्याचे काम त्या प्रयोगशाळा करीत आहेत.


🔰‘इन्साकॉग’ या संस्थेने आतापर्यंत चिंताजनक स्वरूपाचे ७७१ जनुकीय विषाणू प्रकार शोधले असून राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी एकूण १०,७८७ नमुने दिले होते. यातील ७३६ नमुने ब्रिटनमधील बी १.१.७ विषाणूच्या प्रकारचे असून ३४ नमुन्यात दक्षिण आफ्रिकेतील बी १.३५१ हा विषाणू आढळून आला आहे. एका नमुन्यात ब्राझीलचा विषाणू – पी १ सापडला आहे. या चिंताजनक विषाणूंचे प्रकार १८ राज्यांत सापडले आहेत. जनुकीय क्रमवारी व विश्लेषण हे आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या नमुन्यावर आधारित आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...