Thursday 4 March 2021

लिगिया नोरोन्हा (भारतीय): संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP) याच्या नव्या सहाय्यक सरचिटणीस



🌻सयुक्त राष्ट्रसंघाचे (UN) प्रमुख अँटोनियो गुटेरेस यांनी भारतीय अर्थशास्त्रज्ञ लिगिया नोरोन्हा यांची संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP) याच्या सहाय्यक सरचिटणीसपदी नियुक्ती केली आहे.


🌻तयामुळे लिगिया नोरोन्हा भारतीय सहकारी आणि अर्थशास्त्रज्ञ सत्या त्रिपाठी यांची जागा घेणार आहेत.


🌻लिगिया नोरोन्हा ह्या एक अर्थशास्त्रज्ञ आहेत. त्यांच्याकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करण्याचा 30 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 2014 सालापासून नैरोबी येथून UNEP च्या आर्थिक विभागात संचालिक म्हणून काम पाहिले आहे. UNEP मध्ये दाखल होण्यापूर्वी त्यांनी नवी दिल्लीतील 'द एनर्जी अँड रिसोर्स इन्स्टिट्यूट (TERI) या संस्थेमध्ये कार्यकारी संचालिका म्हणून काम केले आहे.


🌻 तसेच त्यांनी संसाधन, नियमन आणि ग्लोबल सिक्युरिटी सेक्शनच्या संचालिका म्हणूनही काम पाहिलेले आहे.


🌻गल्याच आठवड्यात गुटेरेस यांनी गुंतवणूकविषयक तज्ज्ञ असणाऱ्या उषा राव मोनारी यांची संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रमाच्या (UNDP) सरचिटणीस पदी नियुक्ती केली आहे.


संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण कार्यक्रम (UNEP) विषयी


🌻हा संयुक्त राष्ट्रसंघाचा एक अंग असून ते प्रमुख जागतिक पर्यावरण प्राधिकरण आहे. ही संस्था जागतिक पर्यावरण संरक्षणासाठी जागतिक पातळीवर कार्य करते. संस्थेची 5 जून 1972 रोजी स्थापना झाली. संस्थेचे मुख्यालय नैरोबी (केनिया) येथे आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ वर्णनात्मक पद्धतीने होणार की नाही, या बद्दल उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२...