Tuesday 22 June 2021

बोत्सवाना देशामध्ये जगातील तिसरा सर्वात मोठा हिरा सापडला.



🔰आफ्रिका खंडाच्या पूर्व भागात वसलेल्या बोत्सवाना देशामध्ये जगातील सर्वात मोठ्या हिऱ्यांमध्ये गणना होणारा एक हिरा सापडला आहे. हा हिरा ज्वानेंग खाणीत सापडला.


🔴हिऱ्याची वैशिष्ट्ये...


🔰हा हिरा जगातील तिसरा सर्वात मोठा हिरा ठरला आहे.


🔰हिरे शोधणाऱ्या देबस्वाना कंपनीने हा हिरा 1098 कॅरेट वजनाचा असल्याचे स्पष्ट केले आहे.


🔰हिऱ्याची लांबी 73 मिलीमीटर, रुंदी 52 मिलीमीटर आणि जाडी 27 मिलीमीटर आहे.


🔴इतर बाबी...


🔰या हिऱ्याची विक्री झाल्यास त्यापैकी 80 टक्के रक्कम ही सरकारच्या तिजोरीमध्ये जाईल.


🔰दक्षिण आफ्रिकेमध्ये 1095 साली जगातील सर्वात मोठा हिरा (3106 कॅरेट) सापडला होता.


🔰जगातील दुसरा सर्वात मोठा हिरा (1109 कॅरेट) 2015 साली बोत्सवानामध्येच सापडला होता. त्याला “लेसेडी ला रोना” असे नाव देण्यात आले.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 07 मे 2024

◆ दरवर्षी 7 मे रोजी जागतिक ॲथलेटिक्स दिन जगभरात साजरा केला जातो. ◆ भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स नासाच्या स्टारलाइनर मोहिमेअंत...