Monday 19 July 2021

कृष्णविवरांचा शोध



🔸कष्णविवरांचा शोध संग्रहित छायाचित्र कार्ल श्वार्झशील्ड या जर्मन संशोधकाने १९१६ साली आइन्स्टाइनच्या व्यापक सापेक्षता सिद्धांताच्या आधारे, अतिघन वस्तूचे गुरुत्वाकर्षण प्रकाशाला आपल्या कब्जात ठेवण्याइतके तीव्र असू शकेल हे दाखवून दिले. 


🔸तसेच किती अंतरापर्यंत ही अतिघन वस्तू प्रकाशाला आपल्या गुरुत्वाकर्षणाच्या कब्जात ठेवू शकेल, याचेही त्याने गणित मांडले.


🔸 या अतिघन वस्तूला ‘कृष्णविवर’ म्हणतात व हे विशिष्ट अंतर त्या कृष्णविवराचे ‘घटना क्षितिज’ (इव्हेन्ट होरायझन) म्हणून ओळखले जाते.


🔸 घटना क्षितिजाच्या आत घडणारी कोणतीही घटना आपल्याला दिसू शकत नाही.


🔸 कष्णविवरातून कोणत्याही प्रकारचे प्रारण बाहेर पडू शकत नसल्यामुळे कृष्णविवराचा शोध घेणे हे कठीण ठरते.


🔸कष्णविवराच्या अस्तित्वाचा पहिला पुरावा हंस तारकासमूहातील ‘सिग्नस क्ष-१’ या क्ष किरणांच्या स्रोतातून मिळाला.


🔸 सिग्नस क्ष-१ या स्रोताचा शोध १९६५ साली लागला. या स्रोताच्या ठिकाणाशी सूर्याच्या तुलनेत सुमारे पंधरापट वस्तुमान असणारा, निळ्या रंगाचा एक प्रचंड तारा वसलेला आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 22 एप्रिल 2024

◆ केकी मिस्ती यांची HDFC लाइफ इन्शुरन्स बोर्डाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ◆ 6 वर्षांच्या तक्षवी वाघानीने 25 मीटरपेक्षा कमी अ...