केरळमध्ये झिका विषाणूचा रुग्ण आढळला🌼जलै 2021 महिन्यात केरळ राज्यात झिका विषाणूचा पहिला रुग्ण आढळला. राज्यात एक गर्भवती महिला झिका विषाणू संक्रमित आढळली आहे. याचसोबत, मच्छरांमुळे पसरणाऱ्या झिका विषाणूचे संक्रमण भारतात पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे.


🌼तयानंतर तिरुवनंतपुरम शहरात झिका विषाणूचा संसर्ग झालेले आणखी 13 रुग्ण आढळून आल्यानंतर केरळ आणि तामिळनाडूमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रुग्णांच्या चाचणीसाठी नमुने पुणे शहरातील 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी' या संस्थेकडे पाठविण्यात आले होते.


🌼याआधी भारतात 2016-17 या वर्षात गुजरात राज्यात झिका विषाणूच्या संक्रमणाची प्रकरणे समोर आली होती.


⭕️झिका विषाणू


🌼एडीज प्रकारचा डास चावल्याने हा रोग पसरतो. झिका संक्रमणाची लक्षणे डेंग्यू समान असून त्यामध्ये ताप येणे, त्वचेवर लाल रंगाचे डाग, सांधे दुखी तसेच डोळे लाल होणे अशी अनेक लक्षणे रुग्णांमध्ये दिसून येतात. परंतु हा आजार जीवघेणा नाही.


🌼झिका विषाणू संक्रमित व्यक्ती सात ते आठ दिवस या संक्रमणाच्या प्रभावाखाली राहतो. गर्भवती महिलांना झिका विषाणू संक्रमणाचा अधिक धोका असून त्यामुळे जन्माला येणारे मूल अविकसित मेंदूसहीत जन्माला येण्याचा धोका अधिक असतो. बाळाचे डोकं जन्माच्या वेळी सामान्यतः नेहमीपेक्षा लहान असू शकते.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी

प्रश्न 1:- ₹6 लाख कोटी मार्केट कॅप ओलांडणारी 8वी कंपनी कोणती आहे? उत्तर :- भारती एअरटेल. प्रश्न 2:- सियाचीनमध्ये तैनात करण्यात आलेल्या भा...