Saturday 21 August 2021

लढाऊ विमानासाठी DRDO संस्थेने विकसित केले प्रगत शाफ तंत्रज्ञान.



🔰भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) भारतीय हवाई दलासाठी ‘प्रगत शाफ तंत्रज्ञान’ (Advanced Chaff Technology) विकसित केले आहे.


🔰‘प्रगत शाफ तंत्रज्ञान’ हे शत्रूच्या रडारमध्ये पकडले जाण्याच्या धोक्यापासून लढाऊ विमानांचे संरक्षण करणारे तंत्रज्ञान आहे.


🔰DRDO संस्थेच्या जोधपुर येथील संरक्षण प्रयोगशाळा आणि पुणे येथील उच्च ऊर्जा साहित्य संशोधन प्रयोगशाळा (HEMRL) येथे काम करणाऱ्या संशोधकांनी सहकार्याने भारतीय हवाई दलाच्या दर्जात्मक पात्रता पूर्ण करणारे शाफचे साहित्य आणि शाफचे 118/I कार्ट्रीज तयार केले.


🔰भारतीय हवाई दलाला दरवर्षी आवश्यक असलेल्या शाफचा पुरवठा व्हावा करण्याच्या उद्देशाने हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणातील उत्पादनासाठी उद्योगांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.


🔴शाफ तंत्रज्ञानाचे महत्व..


🔰सध्याच्या इलेक्ट्रॉनिक युद्धाच्या युगात, आधुनिक रडार तंत्रज्ञानाचे धोके वाढत असल्यामुळे लढाऊ विमानांचे संरक्षण हा अत्यंत महत्त्वाचा विषय झाला आहे. विमानांना वाचविण्याची खात्री करून घेण्यासाठी इन्फ्रा-रेड आणि रडार यांच्या धोक्याला अप्रत्यक्षपणे पायबंद घालणारी CMDS प्रणाली वापरण्यात येते. शाफ हे शत्रूच्या रडारच्या धोक्यापासून वाचविणारे अत्यंत महत्त्वाचे संरक्षण तंत्रज्ञान आहे. त्यामध्ये अत्यंत कमी प्रमाणात वापरलेले शाफचे साहित्य हवेत असताना शत्रूच्या क्षेपणास्त्राची दिशाभूल करण्यासाठी उपयुक्त ठरते आणि आणि त्यायोगे आपल्या लढाऊ विमानांचे संरक्षण करणे शक्य होते.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...