Wednesday 4 August 2021

MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर

पुणे: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा आयोजित करण्यास आपत्ती व्यवस्थापन विभागानं परवानगी दिली आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागानं परीक्षा घेण्यास परवानगी दिल्यानं परीक्षेचा मार्ग मोकळा झाला आहे. 4 सप्टेंबरला होणार संयुक्त गट ब पूर्व परीक्षा आयोजित केली जाणार आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं या संदर्भात परिपत्रक जारी केलं आहे.

कोरोनामुळे परीक्षा लांबणीवर
मार्च महिन्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्य सेवा परीक्षेनंतर अनेक विद्यार्थ्यांना कोरोना विषाणू संसर्ग झाला होता. त्यामुळे पुणे, मुंबईसह राज्यात आयोगाच्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी केली होती. विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

महाराष्ट्र लोकसेवा आयोग परिपत्रक

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या वतीनं परीक्षेचं आयोजनासंदर्भात परिपत्रक जारी केलं आहे. त्यामध्ये राज्य शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून 3 ऑगस्ट रोजी परीक्षेला परवानगी देणार पत्र प्राप्त झाल्याचं सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षेचे आयोगन 4 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात येईल, असं स्पष्ट केलं आहे. तर, परीक्षेच्या आयोजनासंदर्भात पुढील अपडेटस साठी आयोगाच्या वेबसाईटला भेट देण्याचं आवाहन केलं आहे.

कोणत्या पदासाठी किती जागा?
सहायक कक्ष अधिकारी – MPSC ASO – 67 जागा
राज्य कर निरीक्षक – MPSC STI – 89 जागा
पोलीस उप निरीक्षक – MPSC PSI – 650 जागा
एकूण - 806 जागा
__________

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...