Monday 11 October 2021

उत्तर कोरियाकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची चाचणी.



🔰उत्तर कोरियाने नवीन हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची चाचणी केल्याची माहिती बुधवारी हाती आली आहे. या क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण यशस्वी झाले आहे. हे क्षेपणास्त्र अण्वस्त्रे वाहून नेण्याच्या क्षमतेचे असून उत्तर कोरिया त्याची लष्करी क्षमता वाढवत चालला आहे. अमेरिका व दक्षिण कोरिया यांनी उत्तर कोरियाच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला आक्षेप घेऊनही क्षेपणास्त्र चाचण्या सुरूच आहेत.


🔰उत्तर कोरियाने महिनाभरात तीन चाचण्या केल्या असून उत्तर कोरियाच्या संयुक्त राष्ट्र दूतांनी असा आरोप केला, की अमेरिकेची भूमिका शत्रुत्वाची असून बायडेन प्रशासनाने संयुक्त लष्करी कवायती कायमच्या संपवाव्यात. या भागात शस्त्रास्त्रे  तैनात करू नयेत. उत्तर कोरियाच्या सरकारी माध्यमांनी प्रसिद्धीस दिलेल्या छायाचित्रात शंकूच्या आकाराचे क्षेपणास्त्र अवकाशात झेपावताना दिसत आहे. त्यातून नारिंगी रंगाच्या ज्वाळा प्रक्षेपणावेळी दिसत आहेत.


🔰अधिकृत कोरियन वृत्तसंस्थेने म्हटले आहे, की या क्षेपणास्त्राची पहिलीच चाचणी यशस्वी झाली आहे. त्यात तांत्रिक गरजा पूर्ण झाल्या आहेत. प्रक्षेपण स्थिरता व प्रवास क्षमता, हायपरसॉनिक ग्लायडिंग अस्त्र वेगळे होणे हे सर्व यशस्वीपणे करण्यात आले. दक्षिण कोरियाच्या लष्करी प्रमुखांनी म्हटले आहे, की या क्षेपणास्त्रावर तातडीने भाष्य करण्यात येणार नाही पण ते सुरुवातीच्या टप्प्यात आहे असे दिसते.


🔰उत्तर कोरिया ते क्षेपणास्त्र कार्यान्वित करण्यासाठी आणखी काही वेळ घेईल. जपान व दक्षिण कोरियाच्या लष्कराने असे म्हटले होते, की उत्तर कोरियाने पूर्व सागरात चाचणी केली आहे. दरम्यान उत्तर कोरियाच्या संसदेची बैठक होऊन त्यात आर्थिक धोरणे व युवक शिक्षण या योजनांवर चर्चा करण्यात आली. उत्तर कोरिया आण्विक राजनीतीवरही चर्चा करण्याची शक्यता आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...