Wednesday 17 November 2021

विधान परिषद



- राज्य विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह

- घटनेचे कलम 169 विधानपरिषदेची स्थापना किंवा रद्द करण्याशी संबंधित आहे: संबंधित राज्याच्या विधानसभेने विशेष बहुमताने (2/3) असा ठराव पारित करावा लागतो आणि हा ठराव संसदेत साध्या बहुमताने मंजूर करावा लागतो. 

-------------------------------------

● पात्रता 

- उमेदवार भारताचा नागरिक असावा

- त्याने वयाची 30 वर्षे पूर्ण केलेली असावीत. 

- संसदेने ठरवून दिलेल्या अटींची पूर्तता करणे आवश्यक

-------------------------------------

● सदस्य संख्या

- कमीत कमी 40 (J&K: 36) तर जास्तीत जास्त संबंधित राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या एक तृतीयांश इतके सदस्य

- एक तृतीयांश सदस्य दर 2 वर्षांनी निवृत्त होतात (स्थायी सभागृह)

- सदस्याचा कालावधी 6 वर्षांचा असतो

--------------------------------------

● रचना: कलम 171

[सदस्य: मतदार संघ: महाराष्ट्राच्या विधानपरिषदेतील संख्या]


- 1/12 सदस्य: पदवीधर मतदारसंघातून: 7 सदस्य

- 1/12 सदस्य: शिक्षक मतदारसंघातून: 7 सदस्य

- 1/6 सदस्य: राज्यपाल नियुक्त: 12 सदस्य

- 1/3 सदस्य: स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून: 26 सदस्य

- 1/3 सदस्य: विधानसभा सदस्य निवडून देतात: 26 सदस्य

■ विधानपरिषदेच्या गणपूर्तीसाठी 1/10 सदस्यांची आवश्यकता असता.

--------------------------------------

● विधानपरिषद असलेली राज्ये

[राज्याचे नाव आणि सदस्य संख्या]


- उत्तर प्रदेश (100)

- महाराष्ट्र (78)

- बिहार (75)

- कर्नाटक (75)

- आंध्र प्रदेश (50)

- तेलंगणा (40)

- जम्मू-काश्मिर (36)

■ ओरिसा हे विधानपरिषद स्थापन करणारे देशातील आठवे राज्य ठरले आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

काकोरी कट घटना

( काकोरी ट्रेन लुट म्हणूनही ओळखली जाते) ही ब्रिटिश वसाहतवादी शासनाविरुद्धच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वपूर्ण घटना होती.  - दिना...