Wednesday 2 February 2022

येमेनने यूएईच्या रोखाने डागलेले क्षेपणास्त्र नष्ट.

🔰इस्रायलचे पंतप्रधान इसाक हझरेग हे संयुक्त अरब अमिरातीच्या ऐतिहासिक भेटीवर आलेले असतानाच, येमेनच्या हुथी दहशतवादी गटाने या देशाच्या रोखाने डागलेले एक आंतरखंडीय क्षेपणास्त्र यूएईच्या हवाई संरक्षण दलांनी सोमवारी अडवून नष्ट केले, असे देशाच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितले.

🔰या हल्ल्यामुळे काहीही नुकसान झाले नाही व या क्षेपणास्त्राचे तुकडे वर्दळीच्या भागांच्या बाहेर पडले, असे संरक्षण मंत्रालयाने ‘डब्ल्यूएएम’ या देशाच्या अधिकृत वृत्तसंस्थेला दिलेल्या निवेदनात सांगितले.

🔰‘येमेनमधील ज्या ठिकाणावरून क्षेपणास्त्र डागले गेले, त्या ठिकाणांचा शोध घेतल्यानंतर मिसाईल लाँचर नष्ट करण्यात यूएईचे हवाई संरक्षण दल व कोअ‍ॅलिशन कमांड यांना यश मिळाले,’ असे मंत्रालयाने सांगितले. येमेनमधील अल जौफ येथील आंतरखंडीय क्षेपणास्त्र डागण्याचे फलाट स्थानिक वेळेनुसार दुपारी १२.५० वाजता नष्ट करण्यात आल्याचे सांगताना याचा व्हिडीओही मंत्रालयाने प्रसारित केला.

No comments:

Post a Comment

Latest post

काकोरी कट घटना

( काकोरी ट्रेन लुट म्हणूनही ओळखली जाते) ही ब्रिटिश वसाहतवादी शासनाविरुद्धच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वपूर्ण घटना होती.  - दिना...