Thursday 3 February 2022

सहकार क्षेत्राला मोठा दिलासा.

🔰केंद्र सरकारने सहकारातून समृद्धी संकल्पनेला समोर ठेवून साखर क्षेत्राला मोठा दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी

🔰अर्थसंकल्पात सहकारी संस्थांसाठीचा पर्यायी किमान कर (मॅट) सध्याच्या १८.५ टक्क्यांवरून कमी करून १५ टक्क्यांवर आणला आहे. याचप्रमाणे १  ते १० कोटींपर्यंत उत्पन्न असलेल्या सहकारी संस्थांवरील अधिभार (सरचार्ज) १२ टक्क्यांवरून ७ टक्क्यांपर्यंतचा कर कमी करण्यात आल्याची घोषणा सीतारमण यांनी केली आहे.

🔰सहकारी संस्थांसाठी पर्यायी किमान दर कमी केल्यामुळे त्यांचे  उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे. त्यांचे बहुतांश सदय हे ग्रामीण आणि कृषी अर्थव्यवस्थेशी संबंधित असल्याने त्यांच्यासाठी हा मोठा दिलासा ठरेल.

No comments:

Post a Comment

Latest post

काकोरी कट घटना

( काकोरी ट्रेन लुट म्हणूनही ओळखली जाते) ही ब्रिटिश वसाहतवादी शासनाविरुद्धच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वपूर्ण घटना होती.  - दिना...