Omicron चा BA 2 व्हेरिएंट अधिक घातक; ९३ टक्के रुग्ण ओमायक्रॉनचे असल्याचं सांगत WHO ने दिला इशारा.

🔰जगभरामध्ये वेगाने प्रादुर्भाव होत असणारा आणि तितक्याच वेगाने स्वत:मध्ये सातत्याने बदल घडवणारा ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट जगातील ५७ देशांमध्ये पसरल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय. यामधील धक्कादायक बाब म्हणजे ओमायक्रॉनचा हा नवीन व्हेरिएंट हा मूळ ओमायक्रॉन विषाणूपेक्षा अधिक घातक असल्याचं सांगण्यात येत आहे. हा नवीन व्हेरिएंट अधिक वेगाने पसरत असून केवळ दहा आठवड्यांमध्ये ते ५७ देशांमध्ये पसरलाय. आपल्या साप्ताहिक अहवालामध्ये जागतिक आरोग्य संघटनेनं ओमायक्रॉनसंदर्भातील इशारा दिलाय.

🔰साथीसंदर्भातील आपल्या साप्ताहिक अहवालामध्ये जागितक आरोग्य संघटनेनं मागील महिन्याभरात करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी ९३ टक्के रुग्ण हे ओमायक्रॉनचे आहेत. यामध्ये बीए. १, बीए. १.१, बीए. २, बीए. ३ असे अनेक व्हेरिएंट यामध्ये आढळून आलेत.

🔰यापैकी बीए. १ आणि बीए. १.१. हे सर्वात आधी आढळून आलेले ओमायक्रॉनचे सब-व्हेरिएंट होते. एकूण रुग्णसंख्येपैकी ९६ टक्के रुग्ण हे या दोन व्हेरिएंटचे आहेत.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

 Q.1) इन्फोसिस पुरस्कार 2023 मध्ये भौतिकशास्त्र श्रेणीतील पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ✅ प्रो. मुकुंद थट्टाई Q.2) पहिल्या ‘लाईफटाईम डिस्ट...